GST Collection : नुकताच नोव्हेंबर महिना सुरु झाला असून सणासुदीच्या या महिन्यात सरकारकडून एक खास आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आज अर्थ मंत्रालयाकडून GST संकलनाची यादी जारी करण्यात आले आणि यातले आकडे आपल्याला खरोखर खुश करणार आहेत. आपल्या GST संकलनामध्ये वाढ झाली आहे, आणि हि वाढ थोडी थोडकी नसून 13 टक्क्यांची आहे, त्यामुळेसरकारच्या तिजोरीत 1.72 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.
देशाचे GST संकलन वाढले: GST Collection
मागे जाहीर केलेल्या अहवालामध्ये अर्थ मंत्रालयाने सांगितले होते कि आर्थिक वर्ष 24(FY24) च्या पहिल्या सहामाईत म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर या काळात GST संकलनामध्ये 11 टक्क्यांची वाढ झाली होती, आणि तेव्हा रक्कम 9.92 लाख कोटी रुपयांवर होती. आणि आता पुन्हा एकदा यात सकारात्मक वाढ झाल्यामुळे हि देशासाठी आनंदाची बातमी ठरली आहे. या वर्षात आपण एप्रिल महिन्यात 1.8 लाख कोटी रुपयांची कमाई केली, जिला आपण कमाईचा सर्वाधिक टप्पा म्हणू शकतो.
ऑक्टोबर महिन्यातील GST संकलनामध्ये (GST Collection) गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि वर्षभरात नोंद झालेली हि विक्रमी वाढ म्हणावी लागेल. हि आकडेवारी सांगते कि GST संकलनातून आपण 1,72,003 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. ज्यापैकी 30,062 कोटी रुपये CGST मधून, 38,171 कोटी रुपये SGST मधून आणि 91,315 कोटी रुपये IGST मधून कमावण्यात आले आहेत.