GST Evasion : देशात 1.36 लाख कोटींची GST ची चोरी उघडकीस

GST Evasion : GST म्हणजेच Gross Domestic Product संबंधित काही व्यापाऱ्यांकडून घोटाळा केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या आर्थिक वर्षात 1.36 लाखांची चोरी उघडकीस आल्यामुळे अर्थ मंत्रालयाकडून याबद्दल कसून चौकशी सुरु झाली आहे. GST चे गुप्तचर या संदर्भात शोध मोहीम राबवत आहेत आणि अनेक गैरप्रकारांना आणि समोर आणले आहेत , एवढ्या मोठ्या गुन्हाबदल आता अर्थ मंत्रालय काय निर्णय घेते हे पाहणं आकर्षक ठरणार आहे, जाणून घेऊया संपूर्ण प्रकार..

GST ची चोरी: GST Evasion

काही व्यापाऱ्यांकडून GST संबंधित घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. चुकीची बिले तयार करण्याबरोबरच इतर काही मार्गांनी GST चुकवत या व्यापाऱ्यांनी देशाचे नुकसान केले आहे. अर्थ मंत्रालयाच्या GST गुप्तचर महासंचालाने एक मोहीम सुरु केली आहे, तसेच या विभागाने मोठ्या प्रमाणावर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दाव्यांची प्रकरणे शोधून काढली आहेत. विभागाकडून 57,000 कोटी रुपयांची GST ची चोरी उघडकीस आणण्यात आली आहे आणि या संधार्बत 500 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

या आर्थिक वर्षात 1.30 लाख कोटींची चोरी:

यंदाच्या चालू आर्थिक वर्षात 14,000 कोटी रुपयांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटची 1040 प्रकारणे उघडकीस आली आहेत. या प्रकारामध्ये 91 लोकं दोषी म्हणून सिद्ध झाली आहेत. तसेच 1.30 लाख कोटींची GST चोरी (GST Evasion) झाली आहे. यात काही प्रकाराने बनवट इनपुटची असून काही लोकांनी यात स्वतःच्या इच्छेने 14,108 कोटी रुपये जमा केले आहेत

यंदा जून महिन्यात सिंडिकेटचे मास्टरमाइंड यांचा गुन्हा ओळखून तांत्रिक साधनांचा वापर करून GST चुकावाण्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. अश्या लोकांपासून आपण होईल तेवढं सावधान राहणं गरजेचं आहे कारण ते अनेक प्रकारची आमिषे दाखवून आपली कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करतात, आणि यांचा वापर करून बनावती कंपन्या उघडल्या जातात.