GST News: सरकार बनावट GST रिफंड आणि इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) दाव्यांवर लगाम लावण्याची तयारी करत आहे. सूत्रांच्या मते, सरकार GST रिटर्न फॉर्ममध्ये दुरुस्ती किंवा संपादन करण्याची सुविधा बंद करू शकते कारण एजन्सींच्या तपासात संपादन सुविधांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ असा की, एकदा GST रिटर्न फाइल झाल्यानंतर, करदात्यांना त्यात कोणतेही बदल करण्याची परवानगी मिळणार नाही, आणि म्हणूनच सरकारचा हा निर्णय बनावट रिफंड आणि ITC दाव्यांची संख्या कमी करण्यास मदत करेल.
GST बद्दल समोर आलेली नवीन बातमी काय? (GST News)
GST बद्दल समोर आलेली नवीन बातमी हेच सांगते की सरकार लवकरच GST रिटर्नमध्ये बदल करण्याची सुविधा बंद करण्याचा विचार करत आहे. असे केल्याने बनावट GST रिफंड आणि कर चुकवेगिरी टाळण्यास मदत होईल असे मानले जाते. GST सुधारण्यासाठी किंवा नवीन माहिती समाविष्ट करण्यासाठी रिटर्नमध्ये बदल करण्याची सुविधा अनेकदा आवश्यक असते. ही सुविधा बंद झाल्यास, व्यवसायांना दुरुस्तीसाठी नवीन रिटर्न दाखल करावा लागेल, ज्यामुळे त्यांचे काम आणि वेळ वाढेल.
सध्या, GST रिटर्न दाखल झाल्यानंतर त्यात बदल करण्याची किंवा सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध नाही. व्यापाराऱ्यांना यामुळे होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने काही काळापूर्वी GST Return Form GSTR 1 मध्ये बदल करण्याची आणि GSTR 3B मध्ये ITC (Input Tax Credit) च्या दाव्यात बदल करण्याची सुविधा सुरू केली होती. म्हणजे काय? जर तुम्ही तुमच्या GSTR 1 मध्ये काही चूक केली असेल तर ती चूक सुधारण्याची तुम्हाला एक संधी दिली जाते आणि तुम्ही तुमच्या GSTR 3B मध्ये ITC च्या दाव्यातही बदल करू शकता. ही सुविधा व्यापाराऱ्यांसाठी फायदेशीर ठरते आणि त्यांचे GST रिटर्न दाखल करताना अधिक सोयीस्कर बनवते.
सरकारचे GST चोरी पकडणे अभियान यशस्वी:
सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यापासून GST चोरीला आळा घालण्यासाठी मोहीम राबवली आहे. या मोहिमेत आतापर्यंत 44 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त GST चोरीचा पर्दाफाश झाला आहे. तसेच 29,273 बनावट कंपन्यांचा शोध लागला आहे ज्यांच्या माध्यमातून बनावट Invoicing करून GST चोरी करण्यात आली होती(GST News). या मोहिमेत 121 लोकांना अटकही करण्यात आली असून GST चोरी करण्यासाठी GST रिटर्नमध्ये दुरुस्ती किंवा संपादन सुविधा वापरण्याचे प्रकारही समोर आले आहेत.