GST Notice To LIC: काही दिवसांपूर्वी देशातील प्रसिद्ध विमा कंपनी म्हणजे LIC ला GST कडून दंडात्मक नोटीस पाठवण्यात आली होती. एलआयसी (LIC) कंपनीने त्वरित हा गुन्हा फेटाळला असून लवकरच ते या विरोधात अपील करतील अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली होती. हे प्रकरण अजूनही ताजे असताना LIC च्या विरोधात आणखीन एक नोटीस जारी करण्यात आली आहे. यावेळी कंपनीच्या विरोधात जाहीर करण्यात आलेली नोटीस ही एक डिमांड नोटीस (Demand Notice) असून यात GST विभागाकडून 633 कोटी रुपयांची डिमांड करण्यात आली आहे. एकाच महिन्यात दोन वेळा नोटीस जाहीर झाल्याने याचा विपरीत परिणाम कंपनीवर दिसून येऊ शकतो. अथक मेहनत आणि परिश्रम घेऊन LIC कंपनीने देशभरात सर्वोत्तम विमा कंपनी म्हणून स्थान पटकावलं आहे, मात्र GST विभागाकडून एका मागून एक नोटीस जाहीर झाल्याने कदाचित कंपनीला याचा धक्का बसू शकतो.
आता पुन्हा का मिळाली GST नोटीस? (GST Notice To LIC)
LIC कंपनीला CGST and Central Excise Commissioner आणि Chennai North C Commissionerate Office यांच्याकडून 1 जानेवारी 2024 रोजी नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटीस मध्ये विभागाकडून 663.45 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. LIC कंपनीने देखील या नोटीस बद्दल 3 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजारात माहिती दिली होती. या नवीन नोटीसचे कारण कंपनीकडून वस्तू आणि सेवा कर भरला न गेल्याचे सांगितले जाते. कंपनीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा चुकीचा फायदा घेतल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. याशिवाय, कंपनीने 2017-18 आणि 2018-19 मध्ये GSTR-1 मध्ये उलाढाल किंवा GST पुरवठा घोषित केला नाही, परंतु त्यावर कंपनीला कर भरावा लागणार आहे. नोटीसमध्ये LICला विहित मुदतीत अपील दाखल करण्याची संधी देण्यात आली असून, कंपनी या नोटीसविरुद्ध आयुक्त चेन्नई यांच्याकडे अपील करू शकते.
LIC ला मिळत आहेत लागोपाठ GST नोटीस:
या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात LIC कंपनीच्या नावे दोन वेळा GST नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या वर्षी देखील डिसेंबर महिन्यात तेलंगणा GST विभागाकडून LIC ला 183 कोटी रुपये भरण्याची नोटीस देण्यात आली होती. तसेच 2023 सप्टेंबर महिन्यात बिहार GST विभागाकडूनही कंपनीच्या नावे नोटीस जारी करण्यात आली, यावेळी कंपनीला 290 कोटी रुपये भरावे लागणार होते. गेलं संपूर्ण वर्ष हे LIC च्या दृष्टीने काही चांगलं म्हणता येणार नाही, कारण ऑक्टोबर महिन्यात देखील GST अथॉरिटीज कडून कमी टॅक्स भरल्याच्या आरोपाखाली LIC ला 36,844 रुपये दंड भरण्याचा आदेश देण्यात आला होता (GST Notice To LIC). याशिवाय ऑक्टोबर महिन्यात जम्मू-काश्मीर GST विभागाकडून LICच्या नावे नोटीस जारी करण्यात आली होती. LIC कंपनी आजही ग्राहकांच्या मनात सकारात्मक चित्र उभे करून आहे, मात्र अशाच प्रकारे जर का एका मागून एक GST नोटीस जारी होत राहिल्या तर यामुळे LICच्या व्यवहारावर वाईट परिणाम होऊ शकतो.