GST Notice To Vi : अडचणीत असलेल्या Vi ला GST ची 10.76 कोटींची नोटीस

GST Notice To Vi: Jio प्रमाणे वोडाफोन -आयडिया ही टेलिकॉम कंपनी देखील देशात प्रसिद्ध आहे. वोडाफोन आणि आयडिया यांनी एकमेकांशी हात मिळवणी केल्यानंतर दोन्ही कंपनीच्या ग्राहक वर्गाला भरपूर फायदा झाला. परिणामी वोडाफोन आणि आयडिया म्हणजे आत्ताच्या Vi या कंपनीने दमदार प्रगती करायला सुरुवात केली. मात्र आता वोडाफोन आणि आयडियाचे ग्रह फिरले असून गेल्या काही दिवसांपासून हि कंपनी आर्थिक नुकसानीला तोंड देत आहे. अश्या कठीण प्रसंगी GSTची नोटीस कंपनीसाठी जबरदस्त धक्काच ठरला. तुम्ही जर का वोडाफोन आणि आयडिया(Vi)चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वोडाफोन आणि आयडिया समोरील संकट संपण्याचं नाव घेत नाहीत, कारण आता या कंपनीला केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा 2017, अंतर्गत लखनऊ, उत्तर प्रदेश येथील प्रधान आयुक्त आणि केंद्रीय उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयाने भारी भारकाम दंड ठोठावला आहे. या दंडाची रक्कम ऐकून तर तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल, कारण ही रक्कम साधीसुधी नसून 10.76 कोटी एवढी मोठी आहे. देशात नाव कमवत असलेल्या या टेलिकॉम कंपनीला अचानक कोणत्या कारणास्तव हा दंड ठोठावण्यात आला आहे हे आज जाणून घेऊया….

वोडाफोन आणि आयडियला(Vi) भरावा लागणार मोठा दंड: (GST Notice To Vi)

Vi कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार सीजीएसटी(CGST) प्रणालीमध्ये CENVAT क्रेडिटच्या चुकीच्या ट्रांजेक्शनचा आरोप त्यांच्यावर लागल्यामुळे कंपनीकडून एवढ्या मोठ्या दंडाची वसुली केली जाणार आहे. 3 जानेवारी 2024 रोजी कंपनीला हा आदेश पाठवण्यात आला होता. मात्र कंपनी या आदेशाशी सहमत नसून त्यांनी त्वरित सदर आदेश मागे घेण्यासाठी किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी लवकरच योग्य ती पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.  हा आदेश कंपनीच्या टॅक्स डिमांड, व्याज आणि लावण्यात आलेल्या दंडापर्यंत मर्यादित असणार आहे.

याआधी देखील कंपनीने सोसली आहे कळ:

वोडाफोन आणि आयडिया (Vi) ही कंपनी प्रसिद्ध असली तरी त्यांच्या मागे संकटांची श्रृंखला गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे (GST Notice To Vi). भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने म्हणजेच TRAI दिलेल्या माहितीनुसार या कंपनीला 20.4 लाख ग्राहकांनी ऑक्टोबर महिन्यात कायमचा रामराम ठोकला होता. आज बाजारात केवळ वोडाफोनच नाही तर जिओ(Jio), एअरटेल(Airtel), बीएसएनएल(BSNL) यांसारख्या टेलिकॉम कंपन्या ग्राहक वर्ग आपल्या दिशेने आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा स्पर्धात्मक वातावरणात एवढा मोठा ग्राहक वर्ग कमी होणं हे कंपनीच्या दृष्टीने हिताच नाही. आताच्या घडीला टेलिकॉम मार्केटमध्ये वोडाफोन आणि आयडियाचा 19. 59 टक्के वाटा आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात सुद्धा कंपनीला 7.5 लाख ग्राहकांनी कायमचा रामराम ठोकला होता, म्हणूनच सध्या वोडाफोन आणि आयडिया या कंपनीची परिस्थिती फारशी बरी दिसत नाही.