GST Verification । वर्ष 2017 पासून केंद्र सरकारने देशभरात GST नावाचा नवीन कर लागू केला आहे. हा कर प्रत्येक खरेदी केलेल्या उत्पादनावर आणि सेवांवर लागू होतो. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर जर का तुम्ही बिल तपासून पाहिलेत तर त्यावर काही आकडे GST दर्शवणारे असतात. त्यामुळे कोणतेही बिल भरताना GST तपासून त्यानंतरच पैश्यांची रक्कम द्यावी नाहीतर यात फसवणूक होण्याची भरपूर आशंका असते. अनेक दुकानदार खोटे GST बिल(Fake GST Bill) देऊन ग्राहकांना लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे अश्या दुकानदारांपासून कसे सावध राहावे याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत..
फेक इनव्हॉइस म्हणजे काय?
GST इनव्हॉइस हे एक प्रकारचे बिल आहे. वस्तू किंवा सेवा प्रदान केल्यावर हे बिल दिलं जात. हा एक दस्तऐवज आहे जो हे दर्शवितो की पुरवठादाराने ग्राहकाला कोणती वस्तू दिली आहे, त्यावर किती रक्कम आणि किती कर आकारला गेलाय. या बिलामध्ये पुरवठादाराचे नाव, उत्पादन, उत्पादनाची माहिती, खरेदीची तारीख, सवलत आणि इतर माहिती असते. आणि याउलट फेक इनव्हॉइसमध्ये दिलेली सर्व माहिती हि पूर्णपणे चुकीची असते, आणि याचा वापर ग्राहकांना लुबाडण्यासाठी केला जातो.
Fake GST Bill कसं ओळखाल? GST Verification
GST बिल ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्याचा नंबर तपासून पाहणे (GST Verification) . हा एक 15 अंकी नंबर असतो, ज्याच्या सुरुवातीला पहिले दोन आकडे म्हणजे स्टेट कोड आणि राहिलेले आकडे दुकानदाराचा पेन नंबर असतो. आता हा GST नंबर खरा आहे कि नाही हे तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटची मदत घ्या. तिथे जाऊन बिलवर असलेला नंबर समाविष्ट करून पहा कारण यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दुकानदाराची संपूर्ण माहिती पडताळून पाहायला मिळेल. तसेच अश्या फेक GST बिलांची तक्रार नोंदवण्यासाठी [email protected] ची मदत घ्या.