बिझनेसनामा ऑनलाईन । मार्केटमध्ये मंदी दिसत असतानाही काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदाराना मोठ्या प्रमाणात डिवीडेंट देत आहेत. गुजरात मधील गुजरात थेमीस बायोसिन ही फार्मा कंपनी सुद्धा कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना डिवीडेंट देणार असून हा स्टॉक स्प्लिट होणार आहे. गुजरातमधील या फार्मा कंपनीचे शेअर ३ टक्क्यांनी वधारले आहे. गेल्या ११ वर्षात ह्या कंपनीने ११३७१ टक्के रिटर्न दिला आहे. आता हि कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना डिवीडेंट देणार असून हा स्टॉक स्प्लिट होणार आहे.
आपल्या मार्च कंपनीच्या तिमाहीतील जबरदस्त निकाल नंतर कंपनी १:५ ह्या प्रमाणात शेअर स्प्लिट करणार आहे.शेअर बाजारातील उपलब्ध माहितीनुसार ५ रुपयांच्या फेस व्हॅल्यूला १ रुपयांच्या फेस व्हॅल्यूमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. तसेच २०२२-२०२३ ह्या आर्थिक वर्षासाठी कंपनीने ५ रुपयांच्या फेस व्हॅल्यूसाठी २० टक्के म्हणजेच १ रुपये प्रति शेअर मागे डिवीडेंट देण्याची घोषणा केली आहे. कंपनी डिवीडेंटवर १,४५,२८,७०२ कोटी रुपये खर्च करणार असून गुंतवणूकदारांच्या खात्यात ती रक्कम ९ सप्टेंबर २०२३ नंतर जमा करण्यात येईल. तसेच त्यासाठी रेकॉर्ड डेट १ सप्टेंबर ठरवण्यात आली आहे .
मार्च तिमाहीत कंपनीला २९.५४ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. तर गेल्यावर्षी ह्याच महिन्यात ते उत्पन्न ३०. २७ कोटी रुपये झाला होता. नेट प्रॉफिटच्या आधारावर पाहावयास गेलो तर हा स्टॉक १९. ६४ टक्के वधारत ११. ६९ कोटीं पर्यंत पोहचला आहे. गुजरात थेमिस बायोसिनचा हा शेअर २७ जानेवारी २०१२ रोजी केवळ ७ रुपयांवरून ८०३ रुपयांवर पोहचला आहे. गेल्यावर्षी ३१ डिसेंबर २०२२ रोजी हा शेअर ३७६. १० रुपयांवर स्थिरावला होता. त्यानंतर ६ महिन्यांनी हा शेअर १४५ टक्क्यांनी वधारून १९ डिसेंबर २०२२ रोजी ९२१.०५ रुपयांवर स्थिरावला होता.आता ती तेजी थांबल्यावर हा शेअर १२ टक्के डिसकाऊण्टवर मिळत आहे.