Gutkha Ban In Maharashtra : कोणत्याही प्रकारचे व्यसन हे माणसाला मुळापासून उध्वस्त करू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे असे आपण म्हणतो, पण याबद्दलचा खरेपणा कधी तपासून पाहिला आहेत का? सरकारकडून कायदा बनवला गेला असला तरीही त्याची कितपत अंमलबजावणी केली जाते हा मुद्दा देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. आताच्या घडीला महाराष्ट्रातील गुटखाबंदी ही केवळ एका कागदापूर्ती मर्यादित राहिलेली आहे. राज्यात गुटख्यावर बंदी असून देखील हा व्यवसाय चढत्या दराने सुरू असलेला पाहायला मिळतो. गुटखा आणि इतर व्यसनांबद्दल सरकारने कितीही मोहिमा राबवल्या तरीही पूर्णपणे या व्यवसायांवर रोख लावण्यात आलेली नाही. सरकारच्या नियमानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुटक्याचे Smuggling आणि विक्रेती थांबण्यासाठी जन्मठेपेची शिक्षा देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता यांनी केंद्रीय यंत्रणांना पाठवला आहे आणि ही शिक्षा जर का मंजूर झाली तर यापुढे गुटक्याच्या विक्रीवर जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
महाराष्ट्रात गुटका विक्रीवर जन्मठेप : (Gutkha Ban In Maharashtra)
महाराष्ट्रात गुटखाबंदी असली तरीही इतर राज्यांमध्ये अद्याप हा नियम लागू झालेला नाही, त्यामुळे इतर ठिकाणांहून राज्यात चोरट्या वाहतुकींद्वारे गुटका येतो आणि त्याची अनेक टपऱ्यांवर विक्री केली जाते. पान मसाल्याच्या नावाखाली दर्जा वेगळा करून ही विक्री होते. गुटक्याच्या या गंभीर व्यसनाचे जाळे शहर तसेच राज्याच्या विविध गावांमध्ये देखील पसरलेले आहे. पोलिसांकडून गुटखा विक्रेत्यांच्या विरोधात कितीही कारवाई केली गेली आणि राज्यात गुटखाबंदी सुरू होऊन आता बारा वर्षे उलटली असली तरीही या व्यवसायावर अद्याप संपूर्णपणे रोख लावणे शक्य झालेले नाही.
गुटक्याचा चढत्या दराने सुरू आहे व्यवसाय:
राज्यात गुटख्याचा व्यवसायावर रोख लावलेली असली तरीही आजही विविध भागांमध्ये पाकिटावर दिलेल्या किमतीपेक्षा दीडपट आणि दुप्पट अधिक दराने गुटख्याची विक्री केली जात आहे. विविध भागांमधून गुटखा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी द्यावा लागणारा मलिदा ही संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असलेली मोठी बाब आहे.
राज्या बाहेरून होणारे गुटक्याचे Smuggling थांबवण्यासाठी आता भारतीय दंड विधान संहिता कलम 272 आणि 273 हे दोन्ही कायदे अधिक कठोर करण्यासाठी राज्यातून गुटखा विक्रीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे(Gutkha Ban In Maharashtra). हा प्रस्ताव जर का मंजूर झाला तर येणाऱ्या 5 ते 6 महिन्यांमध्ये महाराष्ट्रात गुटख्याविरुद्ध नवीन कायद्याची अंमलबजावणी केली जाईल.