Harshdeep Hortico IPO : लवकरच आपल्या शेअर बाजारामध्ये एक नवीन कंपनी भाग घेणार आहे ही कंपनी Indoor आणि Outdoor मध्ये सुशोभीकरण करण्यासाठी कुंड्या बनवण्याचं काम करते, सोबतच या कंपनीकडून प्लास्टिकच्या झाडांची विक्री केली जाते. कदाचित तुम्ही Harshdeep Hortico असं एक नाव ऐकलं असेल, ज्यांच्या कंपनीचा आता लवकरच IPO देखील खुला केला जाणार आहे. या नवीन येणाऱ्या IPO ची किंमत 42-46 रुपये प्रति शेअर अशी ठरवण्यात आली आहे. इच्छुक गुंतवणूकदार 29 जानेवारी पासून कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात जी 31 जानेवारी पर्यंत वैध असेल.
Harshdeep Hortico IPO : किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा
हर्षदीप हॉर्टिको या कंपनीच्या IPO साठी किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी 3000 शेअर्स खरेदी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्यांना 135,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. बाकी लॉट साईज गुंतवणुकीत दोन लॉट आहेत ज्याची किंमत 270,000 रुपये अशी आहे. हर्षदीप हॉर्टिको IPO साठी शेअर्सचे वाटप गुरुवार 1 फेब्रुवारी 2024 रोजी होऊ शकते.
हा IPO BSE आणि SME वर तात्पुरत्या सूचीसह सोमवार 5 फेब्रुवारी 2024 रोजी सूचीबद्ध होईल. या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. शिवाय QIB साठी 50 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच, 15 टक्के वाटा उच्च नेटवर्थ लोकांसाठी ठेवण्यात आला आहे.
काय आहे हर्षदीप हॉर्टिको लिमिटेड?
हर्षदीप हॉर्टिको लिमिटेड ही कंपनी Indoor आणि Outdoor दोन्ही भागांसाठी कुंड्या तसेच प्लास्टिकची झाडं तयार करण्याचे काम करते. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर ही कंपनी आपण कंपनी Indoor Plastic Plants, Outdoor Plastic Plant, Decorative Plants, तसेच बाग कामांसाठी उपयुक्त उपकरणांची विक्री करते ज्यात गार्डन हॉल पाईप व वॉटर कन्स्टर अशा गोष्टी सामील असतात.