HCL Technologies Q3 Results : देशातील अनेक IT कंपन्यांनी सादर केलेले तिमाहीचे निकाल शेअर बाजाराला रुचलेले नाहीत. देशातील सर्व दुसरी सर्वात मोठी IT कंपनी म्हणजेच इन्फोसिस, मात्र गेल्या 3 महिन्यांत इन्फोसिसने काही लक्षणीय कामगिरी बजावलेली नसून कंपनीने सादर केलेल्या आकड्यामुळे बाजारातील तज्ञांचा अपेक्षाभंग झाला आहे. असं म्हणतात की काही अपरिहार्य कारणामुळे देशातील आयटी क्षेत्र नुकसानीच्या सामना करीत होते. TCS आणि Infosys प्रमाणेच HCL टेक्नॉलॉजीस (HCL Technologies) या कंपनीने देखील जानेवारी महिन्यापर्यंतच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. सोबतच या कंपनीने शेअर धारकांना डेव्हिडंट देखील देण्याची माहिती काल सर्वांसमोर सादर केली. एचसीएलच्या तिमाही निकालाप्रमाणे त्यांनी 4,350 कोटी रुपयांचा नफा कमवला आहे आणि गेल्या तिमाहीच्या तुलनेत यात 13.5 टक्यांची वाढ झालेली पाहायला मिळते.
कंपनीचा महसूल वाढला – HCL Technologies Q3 Results
जाहीर झालेल्या निकालाप्रमाणे एचसीएल टेक्नॉलॉजीस या कंपनीने नफा तर कमवला आहेच पण यासोबतच त्यांच्या महसुलात देखील वाढ झाली आहे. या कंपनीच्या महसुलात झालेली वाढ ही 6.65 टक्क्यांची असून, नवीन आकडा 28,446 कोटी रुपयांवर येऊन पोहोचला आहे. जुलै ते सप्टेंबर ह्या तिमाहीत जाहीर झालेला महसूल हा 26,672 कोटी रुपये होता.
तिमाही निकालांनुसार, वर्षभराच्या आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 6.2 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय कामकाजातून मिळणाऱ्या महसुलातही 6.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावेळी कंपनीला टेलिकॉम, मीडिया, पब्लिशिंग आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री कडून चांगले सौदे करण्याची संधी मिळाली होती. HCL कंपनीने आता प्रति शेअर 12 रुपये अंतरिम डेव्हिडंट जाहीर केला आहे. त्याची रेकॉर्ड डेट 20 जानेवारी 2024 आणि पेमेंटची तारीख 31 जानेवारी 2024 अशी निश्चित करण्यात आली आहे.
कंपनीचे कर्मचारी मात्र होत आहेत कमी:
देशातील इतर IT कंपन्या यावेळच्या तिमाहीत अपेक्षाप्रमाणे कामगिरी करू शकलेल्या नाहीत. मात्र एचसीएल टेक्नॉलॉजीसचे आकडे पाहता त्यांनी जाहीर केलेल्या आकड्यांमध्ये अंशी सकारात्मकता दिसते (HCL Technologies Q3 Results). पण जर का आपण कंपनीच्या कर्मचारी वर्गाकडे नजर फिरवली तर डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीमध्ये एकूण 2,24,756 कर्मचारी काम करत होते. ज्यामध्ये 3818 नवीन कर्मचारी देखील जोडण्यात आले मात्र, तरीही कंपनीचा इंट्रिशन रेट हा 12.8 टक्क्यांवरच कायम राहतो आणि गेल्यावर्षी कंपनीचा इंटरनॅशनल रेट हा 21.7 टक्के असल्यामुळे आता यात घसरण झालेली पाहायला मिळते.