HDFC Bank बनली जगातील 4 नंबरची बँक; विलीनीकरणाचा मोठा फायदा

बिझनेसनामा ऑनलाईन । आज म्हणजेच 1 जुलैपासून HDFC – HDFC बँकेचे विलीनीकरण (HDFC Bank) लागू होणार आहे. या विलीनीकरणामुळे HDFC बँक ही जगातील सर्वात मोठी 4 नंबरची बँक बनली आहे. 172 अरब डॉलर किंमतीची HDFC बँक आता जेपी मॉर्गन चेज, इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना आणि बँक ऑफ अमेरिका या बँकेनंतर जगातील चौथ्या क्रमांकाची बँक ठरली आहे. HDFC – HDFC बँकेच्या विलीनीकरणानंतर अस्तित्वात आलेल्या नवीन बँकेचे ग्राहक सुमारे 120 दशलक्ष इतके असणार आहेत.

शुक्रवारी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) संचालक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी एक जुलैपासून या बँकांचे विलीनीकरण सुरू होणार असल्याचं सांगत विलनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांनी सांगितलं की, ‘RERA ची अंबलबजावणी, हाउसिंग सेक्टर ला इंफ्रास्ट्रक्चर चा दर्जा मिळेल, परवडणाऱ्या घरांसाठी सरकारचा पुढाकार आणि इतर अनेक गोष्टींमुळे हाउसिंग फाइनेंस बिजनेसमध्ये मोठी भर पडेल. असा आमचा विश्वास आहे.

नवीन बँकेचे ग्राहक सुमारे 120 दशलक्ष- (HDFC Bank)

भारताच्या कॉर्पोरेट इतिहासामध्ये 4 एप्रिल ला सर्वात मोठा करार करण्यात आला होता. या करारानंतर HDFC – HDFC बँक या दोघांची एकत्रित मालमत्ता ही 18 लाख कोटी रुपये एवढी होती. या अधिग्रहणानंतर अस्तित्वात आलेल्या नवीन बँकेचे ग्राहक सुमारे 120 दशलक्ष इतके असणार आहेत. त्याचबरोबर या बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 77 हजार पेक्षा जास्त झाली आहे. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँकेची 100% मालकी सार्वजनिक शेअर्स मालकाकडे जाईल. एचडीएफसीच्या शेअर धारकांकडे बँकेची 41 टक्के मालकी असेल. त्यानंतर एचडीएफसी चा शेअरधारकाला त्यांच्या 25 शेअर साठी बँकेचे 42 शेअर्स मिळतील.