HDFC Bank Loan : HDFC बँकेच्या ग्राहकांना धक्का!! कर्जावरील व्याज महागले

बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. HDFC बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये 0.15% नी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन, पर्सनल लोन वरील व्याज वाढणार (HDFC Bank Loan) असून ग्राहकांना आर्थिक झळ सोसावी लागेल. 7 सप्टेंबर पासून HDFC बँकचा मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट( MCLR) मध्ये 0.15% वाढ करण्यात आली आहे.

HDFC बँकचा नवीन MCLR कसा आहे?

7 सप्टेंबर पासून HDFC बँकच्या MCLR मध्ये अचानक वाढ (HDFC Bank Loan) झाली. झालेल्या बदलांनंतर MCLR 8.35 टक्क्यांवरून 8.50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एक महिन्याचा MCLR 0.10 टक्क्यांनी वाढला असून तो 8.45 टक्क्यांवरून 8.55 टक्क्यांवर पोहोचला आहे. तीन महिन्यांचा MCLR 8.70 टक्क्यांवरून 8.80 टक्क्यांवर 10 बेस पॉईंटने वाढला आहे. सहा महिन्यांचा MCLR 10 बेस पॉईंटने वाढला आहे आणि 8.95 टक्क्यांवरून 9.05 टक्क्यांवर आला आहे.

आता लोनवरील MCLR नेमका किती असेल?

एका वर्षासाठी MCLR वर अवलंबून असलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावर 5 बेस पॉईंटची वाढ झाली आहे. यानंतर नवीन व्याजदार हा 9.10% वरून 9.15% वर पोहोचला आहे. याशिवाय बँकने एक व दोन वर्षांसाठीच्या MCLR वर 0.05 टक्क्यांची वाढ केली आहे.

MCLR वाढल्यामुळे व्याजदर का महागले? HDFC Bank Loan

MCLR हा भारतीय रिझर्व बँक कडून वर्ष 2016 मध्ये लागू करण्यात आला. MCLR हा होम लोनशी जोडलेला असतो, याला फ्लोटिंग व्याज दर असंही म्हटलं जातं. त्याचा लोनशी थेट संबंध असल्यामुळे कर्जाची रक्कम आणि EMI आपोआप वाढते.