HDFC Bank MCLR Rate : HDFC बँकेच्या ग्राहकांना धक्का!! गृहकर्ज- कार लोन महागणार

HDFC Bank MCLR Rate : या सणासुदीच्या काळात अनेक लोकं मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात, का? तर एका सकारात्मक वातावरणात घेतलेली नवीन गोष्ट भरपूर वेळ टिकेल अशी एक आपल्या मनाची धारणा आहे. या वस्तूंमध्ये विशेषकरून गाडी, सोन्याचांदीच्या वस्तू सामावलेल्या असतात. या काही सहजपणे विकत मिळणाऱ्या नाहीत, त्यासाठी भरपूर पैसा द्यावा लागतो. इथूनच संबंध जोडला जातो तो बँक आणि लोन सोबत. पण तुम्हाला माहिती आहे का सर्व लोकांच्या परिचयाची बँक म्हणजे HDFC Bank, या बँकेने ऐन सणांच्या दिवसांत व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना गृहकर्ज तसेच कार वरील लोनसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

HDFC कडून MCLR रेट मध्ये किती वाढ करण्यात आली?

HDFC बँकेकडून MCLR 10 बेसिस पोइंटनी म्हणजेच 0,10 टक्क्यांनी वाढवला आहे. MCLR च्या दरांत अचानक वाढ झाल्यामुळे (HDFC Bank MCLR Rate) होम लोन, कार लोन, पर्सनल लोन यांच्या EMI मध्ये वाढ झाली आहे. सणांच्या काळात जेव्हा ग्राहकांकडून अश्या गोष्टींची मागणी वाढते तेव्हाच बँकने त्यांच्या खिश्याला कात्री लावत आनंदावर विरजण टाकले आहे. MCLR हा डेपोझीट रेट, रेपो रेट, CRR आणि ऑपरेशनल कॉस्टवर अवलंबून असतो. रेपो रेट मध्ये झालेल्या बदलांचा परिणाम MCLRच्या दरांवर होतो आणि परीणामार्थी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा EMI वाढतो. HDFC Bank ने कबुल केल्याप्रमाणे नवीन MCLR दर बाजारात 7 ऑक्टोबर पासून लागू झाले आहेत. आता ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत जास्ती EMI द्यावा लागणार आहे.

नवीन MCLR दर खालीलप्रमाणे : HDFC Bank MCLR Rate

HDFC Bankने ओवरनाईट MCLR मध्ये 10 बेसिस पोइंटची वाढ (HDFC Bank MCLR Rate) केल्यानंतर तो बदलून 8.60 टक्के झाला आहे. तसेच एका महिन्याच्या MCLR मध्ये 15 बेसिस पोइंटची वाढ केल्यामुळे नवीन दर 8.65% झाला आहे. तीन महिन्यांच्या MCLR मध्ये 10 बेसिसी पोइंटची वाढ झाली असून नवीन दर 8.80% आहे. सहा महिन्यांच्या MCLR मध्ये 5 बेसिस पोइंटची वाढ झाली असून आता दर 9.10% आहे तर एका वर्षापेक्षा जास्ती काळासाठी MCLR चा दर 9.20 टक्के झाला आहे. दोन आणि तीन वर्षांच्या MCLR मध्ये मात्र अद्याप बदल केलेले नसून ते अनुक्रमे 9.20 आणि 9.30 टक्क्यांवर कायम आहेत.