बिझनेसनामा ऑनलाईन (HDFC Bank MCLR Rate)। देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्टिंग ऑफ फंड बेस्ट लँडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये 15 बेसिक पॉईंटने वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. एमसीएलआर मध्ये वाढ झाल्यानंतर होम लोन,ऑटो लोन, कंजूमर लोन या सर्वांच्या किमती देखील वाढतील. आणि त्यामुळे तुमच्या EMI वरचा बोजाही वाढणार आहे.
आधी किती होता MCLR ? (HDFC Bank MCLR Rate )
यापूर्वी एका रात्रीसाठी लोन घेत असाल तर त्यावर MCLR हा 8.25 टक्के एवढा होता. आता तो 15 ने वाढून 8.35 टक्के एवढा झाला आहे. तुम्ही एक महिन्यासाठी लोन घेऊन इच्छित असाल तर MCLR 8.45 टक्के एवढा झाला आहे. यापूर्वी एका महिन्यासाठीचा MCLR हा 8.30 टक्के एवढा होता. जर तुम्ही तीन महिन्यांसाठी लोन घेत असाल तर MCLR 8.70 टक्के एवढा असून यापूर्वी हा MCLR 8.60 टक्के एवढा होता. सहा महिन्यासाठी लोन घेणार असाल तर 8.95 टक्के MCLR झाला आहे. हा रेट यापूर्वी 8.90 टक्के होता. त्याचबरोबर जर एक वर्षासाठी तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर MCLR 9.10 टक्के एवढी झाली आहे. यापूर्वी एका वर्षासाठी हा रेट 9.05 टक्के एवढा होता. दोन वर्षासाठी MCLR हा 9.20 टक्के एवढा करण्यात आला आहे.
यापूर्वी BOI, PNB नेही वाढवला MCLR –
MCLR वाढल्यामुळे (HDFC Bank MCLR Rate) ग्राहकावर मोठा परिणाम होणार आहे. हा MCLR फक्त एचडीएफसी बँकेनेच नाहीतर बँक ऑफ महाराष्ट्र, पीएनबी, यासारख्या बऱ्याच बँकेने वाढवला आहे. याचा परिणाम आता सर्वच बँकांमधील नवीन जुन्या दोन्ही ग्राहकांना होऊ शकतो. आता जास्तीत जास्त वर्षासाठी जरी तुम्ही लोन घेतलेले असेल तर यावर देखील MCLR वाढवण्यात आलेला आहे.
MCLR म्हणजे काय ?
MCLR म्हणजे आरबीआयकडून लागू करण्यात आलेला बेंचमार्क आहे. या MCLR च्या माध्यमातून बँका व्याजदर निश्चित करत असतात. आणि रेपो रेट म्हणजे ज्याच्या माध्यमातून बँकांना स्वस्तात कर्ज मिळू शकतं. जर रेपो रेट कमी असेल तर बँक MCLR मध्ये कपात करून कर्जाचा EMI कमी करतात. पण रेपो रेट वाढला तर बँकांनाही आरबीआय कडून कर्ज महाग मिळते. त्यामुळे MCLR वाढतो.