HDFC Bank Share । HDFC बँक हि देशातील अनेक परिचित खासगी बँकांपैकी एक आहे. कुठल्याही छोट्या मोठ्या शहरात नजर फिरवली तरीही निदान एक HDFC बँक नक्कीच दिसते. या बँकेचे ग्राहक देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. अश्यावेळी गेल्या काही दिवसांत बँकच्या शेअर्स मध्ये बदल झालेले पाहायला मिळालेत. तसेच बँकच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झालेली बातमी समोर आली आहे. मागील 4 दिवसांत HDFC बँकेचे 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. यामागील नेमकं कारण काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
HDFC बँकच्या शेअर्समध्ये झाली घसरण: HDFC Bank Share
HDFC बँकच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांमध्ये 6% पेक्षा अधिक घसरण झालेली पाहायला मिळाली, तसेच बँकचे मार्केट कॅपमध्ये सुद्धा 1 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. HDFC चे शेअर्स शुक्रवारी 1,557 रुपयांवर उघडले व 2.11% घसरण झाल्यामुळे 1,524 रुपयांच्या नीचांक पातळीवर पोहोचले. आजचे ताजे अपडेट पाहता शेअर मार्केट बंद होताना बँकच्या शेअर्समध्ये ( HDFC Bank Share)1.57% घसरण झाली होती व ते 1,529 रुपयांवर येऊन थांबले आहेत. HDFC कडून गेल्या सोमवारी विश्लेषकांची बैठक घेण्यात आली होती, जिथे बँककडून नेट वर्थ आणि माल्मातेत थोडी घसरण होऊ शकण्याचे संकेत दिले होते. परिस्थिती बिकट असताना देखील देशातील काही ब्रोकरेज अजूनही HDFC च्या शेअर्सबद्दल सकारात्मक आहेत.
का झाली HDFC च्या शेअर्स मध्ये घसरण:
तज्ञांच्या माते गेल्या काही दिवसांपासून बाजारातील वाढीला रोख लागला आहे. गेल्या ट्रेडिंग आठवड्यात निफ्टी मिडकॅप 100 मध्ये सुमारे 2% घसरण झाली. परदेशी पैश्यांचा वावर आणि HDFC बँकच्या शेअर्सच्या (HDFC Bank Share) विक्रीमुळे हा मोठा बदल झाला आहे. मागचा आठवडा भारतीय शेअर मार्केट साठी चांगला नव्हता. यावेळी सेन्सेक्समध्ये 2.7% घसरण झली तर नेफ्टी 50 या आठवड्यात 2.6% घसरला आहे.