HDFC Bank Success Story : चाळीत राहणाऱ्या माणसाने उभी केली HDFC बँक; आज आहे 4.14 लाख कोटींचे भांडवल

HDFC Bank Success Story: आपल्यापैकी अनेकजणं HDFC बँकचे ग्राहक असतील. हि बँक भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे, दिवसेंदिवस ती नवनवीन ग्राहकवर्ग जोडण्यात यशस्वी होत आहे. मात्र कधी विचार केला का, या बँकची स्थापना नेमकी केली तरी कोणी? कारण कोणतेही झाड मोठे होण्याआधी त्याचं बी रुजवावं लागतं. वेळोवेळी त्याला खतपाणी देऊन मोठं करावं लागतं, तेव्हाच कुठेतरी ते झाड वाढण्याची शक्यता असते. एखाद्या व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट लागू होत नाही का? आपण असे अनेक उद्योगपती पहिले असतील ज्यांनी शून्यातून स्वर्ग उभा केला आहे आणि HDFC बँक हि देखील त्यांमधलीच एक आहे. कसा होता HDFC बँकचा प्रवास जाणून घेऊया…

HDFC बँकची सुरुवात कोणी केली?

भारतात प्रसिद्ध बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, बँक ऑफ बरोडा यांची गणना केली जाते, पैकी HDFC बँकचा नेमका प्रवास कसा होता हे आज उलघडून पाहूयात. जाणून घ्या कि HDFC बँक हि सध्या जगातील चौथी सर्वात मोठी बँक आहे, आणि इथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुद्धा तितकाच प्रेरणादायी आहे (HDFC Bank Success Story). गुजरातमध्ये सुरत या भागात हसमुख पारेख यांनी HDFC बँकचा पाय रोवला होता. हसमुख यांनी वडिलांकडून व्यावसायिक कौशल्याचा वारसा मिळाला. पुढे मुंबईमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यापीठातून इकॉनॉमिक्स पदवी मिळवली आणि त्यानंतर उच्च शिक्षणासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची निवड केली.

वर्ष 1936 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी स्टॉक ब्रोकिंग कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली. सोबतच सेंट झेवियर्स महाविद्यालयात लेक्चरर म्हणून जबाबदारीही सांभाळली. मात्र ब्रोकिंग कंपनीच्या कामाचा त्यांना नेहमीच फायदा झाला, इथून अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली, आणि दिवसेंदिवस मेहनत घेत त्यांनी 1978 मध्ये ICICI बोर्डच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळवली तसेच ती योग्यरीत्या पार पाडली.

पारेख यांनी केली HDFC ची स्थापना (HDFC Bank Success Story):

HDFC बँकेच्या स्थापनेमध्ये पारेख यांची भूमिका सर्वात महत्वाची आहे. मध्यमवर्गीय भारतीयांना वृद्धकाळा पूर्वीच घर बांधण्याची संधी मिळावी असा त्यांचा विचार होता त्यामुळेच 1977 मध्ये वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी HDFC म्हणजेच हाऊसिंग डेव्हलोपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनची सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे का हि भारतातील सर्वात पहिली रिटेल हौसिंग फायनान्स कंपनी आहे. हि बँक सुरु करताना पारेख यांनी स्वतः त्यात 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती, भारत सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय पारेख यांनी सर्वात पहिल्या हाऊसिंग फायनान्स कंपनीची सुरुवात केली आहे (HDFC Bank Success Story).

वर्ष 1994 मध्ये पारेख यांचे निधन झाले, पण याआधी त्यांच्या अभूतपूर्व कार्याचा सत्कार करण्यासाठी त्यांना भारत सरकारकडून 1992 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं. एवढंच नाही तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स कडून त्यांना फेलोशिप देखील प्रदान करण्यात आली होती. आजच्या काळात HDFC बँकच एकूण भांडवल 4.14 लाख कोटी रुपये आहे व ती जगातली चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे.