HDFC Bank: 6 बँकांची हिस्सेदारी विकत घ्यायला RBIने दिली मंजुरी; याचा ग्राहकांवर परिणाम काय?

HDFC Bank: HDFC बँकेने म्हणजेच खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने, दोन्ही व्यवसायांचे विलीनीकरण केल्यानंतर आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. रिझर्व बँकेने HDFC समूहाच्या एका महत्वाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याने बँकेची बँकिंग क्षेत्रावरील पकड मजबूत होणार आहे. HDFCने सहा बँकांमध्ये 9.50% हिस्सेदारी खरेदी करण्याची मंजुरी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) मिळवली आहे, मात्र आता याचा विविध ग्राहकवर्गावर काय परिणाम होईल हे पाहुयात..

HDFC बँकेला मिळाली सर्वोच्य बँकची मंजुरी: (HDFC Bank)

HDFC बँकने ठेवलेल्या प्रस्तावाला आता सर्वोच्य बँक म्हणजेच RBIने मंजुरी दिलेली असून आता तिला 6 बँकांमध्ये हिस्सेदारी विकत घेता येणार आहे. या बँकांमध्ये येस बँक, इंडसइंड बँक, एक्सिस बँक, बंधन बँक, ICICI बँक आणि सूर्योदय स्मॉल फाइनेंस बँक यांचा समावेश होतो. HDFC ने या प्रस्तावाद्वारे बँकिंग क्षेत्रात आपली उपस्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. या 6 बँकांमध्ये हिस्सेदारी खरेदी केल्याने HDFC ला बँकिंग क्षेत्रात एक प्रमुख खेळाडू बनण्यास मदत होईल.

RBIने HDFCच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी बँकेची आर्थिक स्थिती आणि व्यवस्थापनाची क्षमता यांची काळजीपूर्वक तपासणी केली असून RBIला खात्री आहे की HDFC या 6 बँकांमध्ये हिस्सेदारी खरेदी केल्यानंतरही त्यांचे व्यवस्थापन सुरळीतपणे चालेल(HDFC Bank). मात्र लक्ष्यात घ्या ही मंजूरी फक्त 1 वर्षासाठी वैध असेल याचाच अर्थ असा की HDFC ग्रुपने डेडलाइनच्या आत सौदा पूर्ण न केल्यास ही मंजूरी रद्द केली जाईल.

या सौद्याचा ग्राहकांवर काय परिणाम?

या अधिग्रहणामुळे इंडसइंड बँक, यस बँक किंवा इतर कोणत्याही बँकेच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही(HDFC Bank). बँकांचे कामकाज, बँकिंग सेवा आणि ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही, या सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.