HDFC बँकेचे कर्ज महागले; तुमच्या EMI वर किती परिणाम होणार?

बिझनेसनामा ऑनलाईन । जर तुम्हाला छोटा किंवा मोठा बिझनेस सुरू करायचा असेल तर बँक लोनची गरज प्रत्येकाला पडत असते. त्याचबरोबर आजकाल लोक महागड्या वस्तू किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेतून लोन घेत असतात. बँकेकडून या लोन वर वेगवेगळ्या ऑफर देण्यात येतात जेणेकरून ऑफर्स लाभ आपल्याला देखील होतो. परंतु आता देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्टिंग ऑफ फंड बेस्ट लँडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये 0.15 टक्के वाढ केली आहे. यापूर्वी हा रेट 0.05 टक्के होता. आता तो वाढल्यामुळे लोनचा EMI देखील वाढणार आहे. म्हणजेच आता होम लोन, ऑटो लोन, कंजूमर लोन या सर्वांच्या किमती देखील वाढतील.

जर तुम्ही एका रात्रीसाठी लोन घेऊन इच्छित असाल तर आता MCLR 8.25 टक्के एवढा असेल. HDFC बँकेचा एक महिन्याचा MCLR 8.20 टक्क्यांवरून 8.30 टक्क्यांवर गेला आहे. तीन महिन्यांचा MCLR 8.50 टक्क्यांवरून 8.60 टक्के झाला आहे. ६ महिन्यांचा MCLR पूर्वीच्या 8.85 टक्क्यांवरून 8.90 टक्के झाला. त्याचबरोबर जर एक वर्षासाठी तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर MCLR 9.05 टक्के झाला आहे.

MCLR वाढल्यामुळे ग्राहकावर मोठा परिणाम होणार आहे. हे नियम फक्त नवीन ग्राहकांनाच नाही तर जुन्या ग्राहकांना देखील लागू होणार आहे. यामुळे जुन्या ग्राहकांची देखील आता खिसे रिकामे होतील. आता जास्तीत जास्त वर्षासाठी जरी तुम्ही लोन घेतलेले असेल तर यावर देखील MCLR वाढवण्यात आलेला आहे.

हा MCLR म्हणजे आरबीआयकडून लागू करण्यात आलेला बेंच मार्क आहे. या MCLR च्या माध्यमातून व्याजदर निश्चित करत असतात. आणि रेपो रेट म्हणजे ज्याच्या माध्यमातून बँकांना स्वस्तात कर्ज मिळू शकतं. जर रेपो रेट कमी असेल तर बँक MCLR मध्ये कपात करून कर्जाचा EMI कमी करतात. पण रेपो रेट वाढला तर बँकांनाही आरबीआय कडून कर्ज महाग मिळते. त्यामुळे MCLR वाढतो.