HDFC Parivartan Scholarship 2023 : विद्यार्थ्यांना मिळणार 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती; HDFC बँकेची ‘ही’ योजना पहाच

HDFC Parivartan Scholarship 2023 : आपल्या देशातील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण घेण्याची संधी मिळावी म्हणून सरकार नेहमीच प्रयत्नशील असते, वेगळ्या योजना आणि शिष्यवृत्या राबवत कानाकोपर्यातील मुलांना शिक्षण दिलं जातं. कारण शिक्षण घेणं हि प्रत्येक माणसाची मुलभूत गरज आहे आणि सोबतच तो प्रत्येकाचा हक्क देखील आहे. मात्र काही कारणास्तव मुलं या संधीला मुकतात आणि आयुष्यभर दोन वेळेचं जेवण मिळवण्यासाठी अंगावर पडेल ते काम करायला तयार होतात. आजच्या जगात संधी साधू वृत्तीची कमी नाही त्यामुळे हा अशिक्षित समाज नेहमीच त्यांना बळी पडतो. मात्र आता HDFC बँक कडून समाजातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर असून तुम्ही याचा नक्कीच लाभ घेऊ शकता….

HDFC बँक देणार शिष्यवृत्ती: (HDFC Parivartan Scholarship 2023)

समाजातील गुणवंत आणि गरजू मुलांना मदत करण्यासाठी HDFC बँक समोर आली आहे. बँकतर्फे वर्ष 2023- 24 साठीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 31 डिसेंबर अशी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्यामुळे दिलेल्या मुदतीच्या आत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान बँकने केले आहे. HDCF बँक परिवर्तन योजना (HDFC Parivartan Scholarship 2023) असे या योजनेचे नाव असून इयत्ता 1 ली ते पदव्युतर शिक्षण घेणारे विद्यार्थी योजनेचा भाग बनू शकतात.

योजनेतर्गत मुलांना शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार वेगवेगळी रक्कम मदत म्हणून दिली जाईल. जसे कि इयत्ता 1 ते 6 वी पर्यंत 15 हजार रुपये, इयत्ता 7 ते 12 वी 18 हजार रुपये, ITI/Polytechnic/Diplomaसाठी 18 हजार रुपये, पदवीचे शिक्षण जर का जनरल असेल तर 30 हजार रुपये तर प्रोफेशनलसाठी 25 ते 50 हजार आणि पदव्युत्तर जनरल शिक्षणासाठी 35 हजार तर प्रोफेशनल कोर्ससाठी 75 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल.

योजनेसाठी पात्रता काय?

सर्वात आधी अर्ज करणारा विद्यार्थी हा इयत्ता पहिली ते बारावी, डिप्लोमा, ITI तसेच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणारा असावा. विद्यार्थ्याला मागच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात 55 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त असणे अनिवार्य आहे, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न 2 लाख किंवा 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावे, इतर योजनांप्रमाणेच इथे देखील विद्यार्थी भारताचा नागरिक असणे अत्यावश्यक आहे. (HDFC Parivartan Scholarship 2023).

आवश्यक कागदपत्रे –

सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो, मागील वर्षाचे गुणपत्र,आधार कार्ड/वोटिंग कार्ड/महाविद्यालयाचे ओळखपत्र/बोनाफाईट/ वाहन चालवण्याचा परवाना/ पालकांचे उत्पन्न दाखवणारे कागदपत्र/फी भरलेली पावती इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. पात्र असलेले विद्यार्थी HDFC Bank Parivartan’s ECSS Program च्या अधिकृत संकेतस्थळांवर आवेदन सादर करू शकतात .