Health Insurance : सरोगेट महिलांना मिळणार आधार; 36 महिन्यांपर्यंत घेता येईल सवलतींचा लाभ

Health Insurance : या जगात जर का सर्वात महत्वाचं आणि भरपूर काल्ज्जी घेऊन जपून ठेवावं असं काही असेल तर ते म्हणजे आपलं आरोग्य. आणि या धकाधकीच्या जीवनात सर्वात जास्ती हेळसांड जर कुणाची होत असेल तर ती आहे आपल्या आरोग्याची. या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी आपण वाटेल ते सगळे कष्ट करायला तयार असतो, मात्र त्यात शरीराकडे पुरेसा वेळ मात्र दिला जात नाही. अश्या अनेक योजना आणि हेल्थ इन्शुरन्सीस असतात, ज्यांचा वापर करून आरोग्याची काळजी घेणं सोपं आहे. Star Health and Allied Insurance Co. Ltd. ने सरोगसी झालेल्या महिलांसाठी अशीच एक पॉलिसी आणली आहे या पोलिसीच्या अंतर्गत महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून ते डिलिवरीच्या नंतर येणारा सगळा वैद्यकीय खर्च सामावलेला आहे, पोलिसी धारक सरोगेट महिलेला 36 महिन्यांच्या कालावधीसाठी पोलिसीचा वापर करता येतो. सोबतच कंपनी Oocyte दोणार कव्हर देण्याच्याही पूर्ण तयारीत आहे.

यावर बोलताना कंपनीचे सर्वेसर्वा आनंद रॉय म्हणाले कि महिलांच्या जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांना आश्वस्त करण्यासाठी आणि वाढत्या वैद्यकीय खर्चाची चिंता कमी करण्यासाठी हि पोलीसी (Health Insurance) काळजीपूर्वक तयार करण्यात आली आहे. या पोलिसीमध्ये मिळणारे कव्हर उपचाराच्या पहिल्या दिवसापासून सुरु होते, दरम्यान जर का महिलेला अपघाती गर्भपाताला सामोरे जावे लागले तरीही या दुर्दैवी घटनेत कंपनी त्यांच्या सोबत कायम राहण्यासाठी वचनबद्ध आहे.

या गोष्टी महत्वाच्या: Health Insurance

वरील फायद्यांचा लाभ करवून घेण्यासाठी सदर पोलिसीमध्ये दिल्या गेलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. यादरम्यान इच्छुक जोडपे, सरोगेट महिला आणि उपचार करवणाऱ्या हॉस्पिटलने सरोगसी कायदा आणि IRT कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. शिवाय राष्ट्रीय ART आणि सरोगसी रजिस्ट्रीमध्ये मान्यताप्राप्त आणि नोंदणीकृत संस्थांमध्ये सरोगसी आणि Oocyte बद्दल देणगी प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे.