Health Insurance Policy सगळेच आजार कव्हर करते का? चला जाणून घ्या….

Health Insurance Policy । आपण एखाद्या गोष्टीची Policy का काढतो, तर संकटाच्या काळात त्या गुंतवलेल्या पैश्यांची मदत व्हावी म्हणून. आजच्या जगात आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यावर अमाप पैसाही खर्च होतो. आजारपणावर होणारा वाढता खर्च पाहता आपण कधी कधी असा विचार करतो कि, अशी कोणती यपजन आहे का ? जिचा वापर करून एकाच पॉलिसीमध्ये अनेक आजारांचा खर्च सामावला जाऊ शकतो? तर चिंता करू नका.. खरं तर आपल्या आजूबाजूला सगळ्याच सुख सुविधा उपलब्ध असतात फक्त आपल्याला त्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे याचा फायदा करून घेण्यात आपण अपयशी ठरतो, आज जाणून घेऊया अशाच एका पॉलिसीबद्दल …. जी माणसाला होणारे बरेचसे आजार सामावून घेते…

Health Insurance Policy:

हि Policy तुम्ही वयाच्या कोणत्याही क्षणी घेऊ शकता, फरक एवढाच कि वयानुसार त्यांच्या मिळणाऱ्या सुविधांमध्ये बदल होत जातात. तरुण वयात मिळणाऱ्या सुविधा आणि वृद्धांसाठी मिळणाऱ्या सुवढी या पोलीसीअंतर्गत बदलत जातात. जर का तुम्ही वयाच्या 50व्या वर्षी विमा पोलीसी घेण्याचा विचार करत असाल तर सामान्य पोलीसी विकत घ्यावी यात वयानुसार प्रीमियम वाढत नसला तरीही रक्कमेत दरवर्षी दुप्पट पटीने वाढ होते आणि यात सर्व गंभीर आजारांचा समावेश होतो.

किती रुपयांची Policy घाव्यी?

तुम्ही एकदा Health Insurance Policy विकत घेतल्यानंतर कंपनीला त्याची रक्कम वाढवण्याचा संपूर्ण अधिकार असतो. आपल्याला दररोजच्या आयुष्यात असा अंदाजही नसतो कि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपले असलेले आजार बळावतील किंवा नवीन आजार उद्भवतील, कदाचित म्हणून आपण कधीच जास्ती रकमेची गुंतवणूक करत नाही. मात्र एकदाका आजार वाढत गेले कि आंपण रक्कम वाढवण्याचा प्रयत्न सुरु करतो. कंपनी हे जाणते आणि म्हणून ती रकमेत वाढ करत नाही, त्यामुळे Policy ची सुरवात करताना किमान 8 ते 10 लाख रुपयांपासून करावी (Health Insurance Policy).

एका Policy सुरु असताना दुसऱ्या पॉलिसी घ्याव्यात का?

नक्कीच तुम्ही एक Policy सुरु असताना दुसरी Policy सुरु करू शकता, फक्त ती नवीन Policy सुरु करताना जुन्या Policy बद्दल सगळी माहिती अधिकाऱ्यांना द्या. जरी कोणी हि माहिती विचारली नाही तरीही स्वताहून तुम्ही ती द्या कारण सुरक्षेच्या दृष्टीने तेच योग्य आहे, कोणतीही कंपनी यांनतर तुमच्यावर दावा करू शकत नाही, आपण कोणती पोलीसी घ्यावी हे सर्वस्वी ग्राहकावर अवलंबून आहे. तसेच तुम्ही कुटुंबियांना या Policy चा फायदा करवून देऊ शकता. जर का परिवारातील एखादा सदस्य आजरी असेल आणि त्या आजाराची नोंद तुमच्या पोलीसी मध्ये केलेली असेल तर तो माणूस डिस्चार्ज घेताना याचा फायदा घेऊ शकतो, कोणतीही गुंतवणूक करण्याआधी सर्व नियम व अटी तपासून घ्या आणि नंतरच निर्णय पक्का करा.