Health Insurance : जीवनात जर का सर्वाधिक महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे आपले आरोग्य. जो माणूस आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेऊ शकतो तोच खरा सुखी म्हणावा लागेल. दैनंदिन जीवनात कामाच्या गडबडीत आणि दररोजच्या धावपळीत नकळत आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला वेळ पुरात नाही, आणि सगळ्यात महत्वाच्या घटकाकडेच सगळ्यात जास्त दुर्लक्ष्य केलं जातं. आज आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल जरा अधिक माहिती घेऊया, अनेकवेळा हा इन्शुरन्स घेताना लोकं जुनं आजारपण लपवून ठेवतात, पण तुम्हाला माहिती आहे का याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. आणि या परिणामांपासून सावध राहण्यासाठी काय करावं हे जाणून घेण्यासाठी आमची ही बातमी नक्की वाचा…
जुने आजार लपवून ठेऊ नका : (Health Insurance)
तुम्ही आजूबाजूला अश्या अनेक व्यक्ती पहिल्या असतील ज्या शुगर आणि ब्लड प्रेशरमुळे त्रस्त असतात. हे आजार आता कोणाचं वय बघत नाहीत का काम, आजच्या जगात शुगर आणि ब्लड प्रेशर यांमुळे कोणीही आणि कधीही आजारी पडू शकतो. असे आजार आपल्याला किरकोळ वाटतात आणि म्हणूनच त्यांची नोंद अनेकवेळा इन्शुरन्समध्ये केली जात नाही. पण जाणून घ्या कि हि एक मोठी चूक ठरू शकते, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपन्या तुमचा इन्शुरन्स (Health Insurance) कायमचा रद्द देखील करू शकतात.
याबाबतचे आकडे सांगतात कि इन्शुरन्स क्लेम रद्द होण्याचे 25 टक्के कारण हे केवळ जुन्या आजारांची नोंद न करणे हेच आहे. यासंदर्भात बोलताना या क्षेत्रातील तज्ञ सांगतात कि अनेक जणांना अजूनही विमा पॉलिसी बद्दल हवी ती माहिती मिळालेली नाहीये आणि म्हणूनच ते नकळतपणे अनेक चुका करून बसतात आणि मग त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
इन्शुरन्स क्लेम रद्द का होतात?
पॉलिसी बाजार कडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे कि प्रतीक्षा कालावधी पूर्ण न केल्यामुळे तब्बल 18 टक्क्यांपेक्षा अधिक इन्शुरन्स केलं नाकारण्यात आले आहेत.तसेच 25 टक्के क्लेम हे कव्हरेजच्या बाहेर जात असल्याने नाकारण्यात आले. अनेक इन्शुरन्स पोलिसिज मध्ये डे केअर आणि OPD यांचा समावेश केला जात नाही आणि ग्राहक नेमके त्याचाच दावा करतात, परीनामार्थी क्लेम रद्द केला जातो. त्यामुळे एक इन्शुरन्स पोलिसीचे कव्हरेज समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. पोलिसी बद्दलची सर्व कागदपत्रे नीट वाचून आणि समजून घेऊन त्यानंतरच तिची निवड करावी.
सर्वेक्षणात आढळून आलेली टक्केवारी सांगते कि अयोग्य फायलिंगमुळे 4.5 टक्के क्लेम बाहेर पडले आहेत. 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे क्लेम नाकारण्याची संख्या हि 5 लाख पर्यंतच्या विम्याच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याबद्दलची संपूर्ण आणि योग्य माहिती इन्शुरन्स तयार करताना अधिकाऱ्यांना देणे फारच महत्वाचे आहे.