Hello UPI : आता फक्त आवाजाने पाठवा एकमेकांना पैसे; कसे ते पहा

बिझनेसनामा ऑनलाईन । पैश्यांचा व्यवहार आता अगदीच सोपं झालं आहे, कुणाच्या घरी जाऊन आत्ता पैसे देण्या-घेण्याची गरज नाही. बँकच्या ऑनलाईन सर्व्हिस उपलब्ध असल्याने अनेवेळा आपण Gpay, Phonepay चा वापर करतो. छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी असो किवा एखादा दुकानाचं बिल देण असो या ऑनलाईन सोयीमुळे सगळेच व्यवहार सोपे झाले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का आत्ता केवळ “Hello UPI” म्हणत झटपट Transaction होऊ शकतं. होय, आता फक्त तुमच्या आवाजानेच व्यवहार करता येणार आहे. कसे ते जाणून घेऊया.

कोणी सुरु केलंय Hello UPI?

ही नवीन पद्धत National Payment Corporation Of India ने सुरु केलेली आहे. सध्या तरी ही सुविधा इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे. मात्र लवकरच या सुविधा इतर भाष्यांमध्ये देखील वापरता येतील. एकतर भारतातील UPI Payment ची ख्याती देश विदेशात पसरलेली आहे, अश्यातच UPI व्होईस मोड पेमेंट ( Hello UPI) ची सुरुवात म्हणजे ‘सोने पे सुहागा’ झालेला आहे. व्होईस मोड पेमेंटची खरी मजा म्हणजे इथे मोबाईल मध्ये डोकं खुपसून बोटं चालवण्याची गरज नाही, तर केवळ दोन शब्द बोलून आपण हे transaction करू शकतो.

यात App, Phone Call and Internet Of Things चा वापर करून आर्थिक व्यवहार करता येतो. तुम्ही जर का कधी Google Voice Assistance किंवा Alexa चा वापर केलेलं असेल तर तुम्हाला या नवीन तंत्राची अपोआप ओळख पटेल, कारण दोघेही एकार्थी त्याच प्रकारे काम करतात. फक्त या कामाचं स्वरूप वेगळ आहे.

RBI च्या गव्हर्नरनी केले Hello UPI चे उद्घाटन:

Hello UPI मुळे अनेक आर्थिक व्यवहार सोपे होणार आहे, केवळ आवाजावरून होणाऱ्या या प्रक्रियेमुळे आपला भरपूर वेळ देखील वाचणार आहे. या नवीन सेर्व्हेसीसचं उद्घाटन RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ग्लोबल फिन्टेक फेस्ट मध्ये केलं.

सध्या या व्यवहारावर 100 रुपयांची Limit आहे:

या संकल्पनेचा प्रमुख उद्देश हा Digital Payment वाढवणे असा आहे. आपल्या पंतप्रधानानी ‘Cashless India’ ला पाठींबा दिला आहे. सध्यातरी या व्होईस पेमेंटवर 100 रुपयांची Limit लावण्यात आली आहे. केवळ Hello UPI म्हणून तुम्हाला हे पेमेंट करता येतं.

हे नवीन UPI कसं चालत?

ज्या बँक मध्ये तुमच्या मोबाईल नंबरची नोंद केलेली आहे, तिथे तुम्हाला एक मोठी लिस्ट दिसेल. त्यामध्ये आपल्याला हव्या असलेल्या बँकची निवड करून call करावा. आपल्या बँकचं नाव सांगून कुणाला पैसे द्यायचे आहेत त्या व्यक्तीचं नाव सांगावं. शेवटी Transaction असं लिहून UPI PIN दयावा. या नंतर तुमचा आर्थिक व्यवहार पूर्ण होतो.