High Interest to Senior Citizens : हे नवीन वर्ष अनेकांसाठी लाभदायक ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील विविध क्षेत्रांमधील ग्राहकांना अधिकाधिक आनंददायी अशा बातम्या मिळाल्या. बँकिंग क्षेत्राकडे नजर फिरवायची झाल्यास सध्या खासगी क्षेत्रातील अनेक बँका जेष्ठ नागरिकांना चांगलाच व्याजदर मिळवून देत आहेत. वृद्ध काळ हा असा काळ असतो, जिथे आयुष्यभर मेहनत केलेल्या शरीराला आरामाची गरज असते. संपूर्ण आयुष्य कष्ट करून मिळवलेला पैसा बँक किंवा आर्थिक संस्थांमध्ये गुंतवून त्यातून अधिकाधिक फायदा मिळवला जातो आणि म्हणूनच वृद्धावस्थेत असताना फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) वरून मिळणारे व्याज हे ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचे असते. गुंतवणुकीवर जेवढा जास्ती व्याज, तेवढाच अधिक फायदा मिळत असतो. आत्ताच्या घडीला तीन वर्षांच्या फिक्स डिपॉझिट वर वृद्ध नागरिकांना 8.1 टक्क्यांपर्यंत व्याज दिलं जात आहे. मात्र लक्षात घ्या, की यासाठी तुमची गुंतवणूक दोन कोटी रुपयांपेक्षा कमी असली पाहिजे.
कोणत्या बँका देत आहेत उत्कृष्ट व्याजदर? (High Interest to Senior Citizens)
देशातील ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी काही बँका 8 तसेच अधिक टक्क्यांचे व्याज दर (High Interest to Senior Citizens ) लागू करीत आहेत. तुम्ही देखील या बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट करत दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ मिळवू शकता, मात्र या बँका आहेत तरी कोणत्या हे जाणून घेऊया…
१) DBC बँक:
आताच्या घडीला ही बँक ज्येष्ठ नागरिकांना फिक्स डिपॉझिट वर 8.1 टक्क्यांच्या नुसार व्याज देत आहेत. इथे जर का तुम्ही सविस्तर 37 महिन्यांच्या मुदतीसाठी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केली तर तुमचे पैसे 8.8 वर्षात दुप्पट होतील.
२) RBL बँक:
ही सामान्य बँके जेष्ठ नागरिकांना फिक्स डिपॉझिटच्या गुंतवणुकीवर 8 टक्के व्याज देत आहे. तुम्ही जर का या बँकमध्ये 24 ते 36 महिन्यांसाठी मोठी गुंतवणूक केलीत, तर यावर तुम्हाला आकर्षक व्याज दिले जाईल आणि केवळ नऊ वर्षात तुम्ही एफडी (FD) वरील रक्कम दुप्पट दराने परत मिळवू शकता.
३) इंडसइंड बँक:
वरील दोन बँकांप्रमाणेच ही बँक देखील ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्क्यांचा व्याज देत आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला 2 वर्ष 9 महिने ते 3 वर्ष 3 महिन्यांसाठी फिक्स डिपॉझिट मध्ये पैशांची गुंतवणूक करावी लागेल. आणि ही गुंतवणूक योग्यरीत्या केल्यास तुम्ही नऊ वर्षात दुप्पट पैशांचा लाभ मिळू शकता (High Interest to Senior Citizens).
४) IDFC बँक:
ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्क्यांनी व्याज देत आहे. वरील तीन बँकांच्या तुलनेत हा व्याजदर कमी असला तरीही इथे तुम्हाला 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट मध्ये पैशांची गुंतवणूक करावी लागेल व पुढे 9.2 वर्षांच्या कालावधीत तुम्ही दुप्पट रक्कम परत मिळू शकता.
५) ICICI बँक:
ICICI ही देशातील प्रसिद्ध बँकांपैकी एक आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे ही बँक देखील जेष्ठ नागरिकांना मदतीचा हात देत 7.5 टक्क्यांचा व्याजदर देऊ करत आहे. इथे जर का तुम्ही 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षाच्या कालावधीसाठी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केली तर येणाऱ्या 9.6 वर्षात तुम्ही दुप्पट पैशांचा लाभ अगदी सहज मिळवू शकता.