High Net Worth Individual: भारतात वाढली श्रीमंत व्यक्तींची संख्या; 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारे तब्बल 136 जण

High Net Worth Individual : गेल्यावर्षी देशाच्या अर्थव्यवस्थेने अगदी उत्तम कामगिरी करून दाखवली. जगाच्या पाठीवर भारताने सर्वोत्तम असल्याचा दर्जा मिळवला आहे. मात्र आता ही महत्त्वाची बातमी जाणून घ्या, कारण गेल्या काही वर्षांमध्ये देशातील श्रीमंत लोकांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली आहे. एसबीआय (SBI) ने एका संशोधन अहवालात जारी केलेल्या माहितीनुसार देशात 100 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या ही पाच पटीने वाढली आहे. वर्ष 2013-14 या आर्थिक वर्षात 100 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लोकांचे संख्या ही केवळ 23 होती, जी मागच्या सात वर्षांच्या काळात 136 वर येऊन पोहोचली आहे. देशात श्रीमंतांची संख्या वाढणे याचा अर्थ असा होतो की, देश पुन्हा एकदा आपलं हरवलेला वैभव परत मिळवण्याच्या मार्गावर आहे. असं म्हटलं जायचं की जुन्या काळात भारतातून सोन्याचा धूर निघत असे, म्हणजेच काय तर देशात अधिकाधिक जनता ही श्रीमंतीत वाढायची. आता पुन्हा एकदा हा चढता क्रम पाहिला तर येणाऱ्या काही काळात भारत सर्वोत्तम कामगिरी करून दाखवेल याबद्दल खात्री वाटते.

भारतात श्रीमंतांची संख्या वाढत आहे : (High Net Worth Individual)

सध्या भारतात श्रीमंतांची संख्या आणखी पाच पटीने वाढल्याची माहिती एसबीआय (SBI) च्या एका संशोधन अहवालातून जाहीर करण्यात आली. आर्थिक वर्ष 2013-14 यात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या लोकांचे संख्या ही केवळ 23 होती, व या लोकांचे एकूण उत्पन्न 29 हजार 920 कोटी रुपयांच्या घरात होते. त्यानंतर केंद्र सरकार बदलले आणि आर्थिक वर्ष 2020-21 पर्यंत 21 कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या भारतीयांची संख्या 136 वर येऊन पोहोचली, याचाच अर्थ असा की मागच्या सात वर्षात भारतात 100 कोटींपेक्षा अधिक पैसे कमावणाऱ्या लोकांच्या संख्येत सुमारे 5 पटीने (High Net Worth Individual) वाढ झाली आहे.

2013-14 या आर्थिक वर्षातील 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांचा वाटा 1.64 होता. लक्षात घ्या की शंभर कोटींपेक्षा अधिक पैसे कमावणाऱ्या लोकांच्या संख्येत गेल्या सात वर्षात वाढ झालेली असली, तरी सर्व करदात्यांच्या एकूण उत्पन्नातील वाटा हा 0.77 टक्क्यांवर आला आहे. हा अहवाल असेही सांगतो की पाच ते दहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळवणाऱ्या कर्जाच्या संख्येत 295 टक्क्यांची वाढ झाली असून याच कालावधीत आयटीआर (ITR) भरणाऱ्या आणि दहा ते पंचवीस लाख रुपये कमावणाऱ्या कर्जादारांच्या संख्येत 3 पटीने वाढ झाली आहे.