बिझनेसनामा ऑनलाईन । आपण आपल्या पैशाच्या सेविंगसाठी वेगवेगळ्या प्रकारची बचत करत असतो. त्यापैकीच एक मार्ग म्हणजे FD . विविध प्रकारच्या बँका FD वर वेगवेगळ्या प्रकारचे व्याजदर देत असतात. आपण सुद्धा जास्तीत जास्त व्याज (Highest Bank FD Rates) कुठे मिळेल याचा विचार करत आहोत. त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला अशाच एका बँकेबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ज्याठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगल्या व्याजदरासह मजबूत असा रिटर्न मिळू शकले. सूर्योदय लघु वित्त बँक असं या बँकेचे नाव असून या बँकेने 9.1 टक्के व्याजदर देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
सूर्योदय लघु वित्त बँक एक छोटी वित्त बँक आहे. या बँकेकडून ग्राहकांना फिक्स आणि बचत बँक ठेवीवर सर्वात जास्त रिटर्न्स दिला जातोय. सूर्योदय लघु वित्त बँक 13 राज्य आणि 564 केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध असून या बँकेसोबत 1.64 मिलियन ग्राहक जोडले गेले आहेत. देशातील इतर बँकाच्या तुलनेत या बँकेत FD वर जास्त रिटर्न मिळत असल्याने गुंतवणुकीसाठी ही बँक सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.
किती व्याजदर मिळतोय – (Highest Bank FD Rates)
सूर्योदय लघु वित्त बँक (SSFB) या बँकेने निवडक मुदत ठेवीवर फिक्स डिपॉझिट साठी व्याजदर मध्ये (Highest Bank FD Rates) काही सुधारणा केल्या आहे. या यानुसार बँक सामान्य नागरिकांसाठी 4.00 टक्के ते 8.60 टक्के या दराने व्याज देत आहे. तसेच ही बँक जेष्ठ नागरिकांसाठी सात दिवस ते दहा वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी 2 करोड पेक्षा कमी रकमेवर 4.50 ते 9.10 टक्क्यांच्या दराने व्याज देत आहे. या बँकेने जाहीर केलेली ही दरे 7 ऑगस्ट पासून जारी करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, सूर्योदय लघु वित्त बँकेकडून दोन ते तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी साठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दारांना 8.60 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर (Highest Bank FD Rates) देत असते. यापूर्वी हे व्याजदर 9.10 टक्के एवढे होते. तसेच ही बँक बचत खाते धारकांना पाच लाख रुपयांपासून दोन कोटी रुपयांपर्यंतच्या स्लॅब वर 7.00 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. बँकेकडून देण्यात आलेले हे व्याजदर ग्राहकांसाठी सर्वात उत्तम आहे.