Home and Car Loan : दिवाळीच्या मुहूर्तावर ‘या’ बँका देतायत होम आणि कार लोनवर बंपर ऑफर

Home and Car Loan : सणासुदीच्या दिवसांत बँकांकडून काही न काही सवलती देऊ केल्या जातात. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी दिवाळीचा सण उत्साही आणि आनंदी वातावरणात जावा म्हणून आता SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया एक नवीन ऑफर घेऊन आली आहे. अश्या प्रसन्न वातावरणात आपण नवीन गाडी किंवा नवीन घर घेण्याच्या विचार करत असतो, कारण आपली मानसिकता अशी असते कि अश्या शुभ मुहूर्तावर विकत घेतलेल्या वस्तू या दीर्घ काळ टिकतात आणि म्हणून बँकांच्या सवलतींची आपण अगदी आतुरतेने वात पाहत असतो.

देशात सुरु होणार दिवाळीचा धमाका :

पुढच्या आठवड्यात देशभरात दिवाळीचा धमाका सुरु होईल. दिवाळी, पाडवा, भाऊबीज यांसारख्या अनेक सणांनी घर उजळून निघेल.आणि काही लोकं याच दरम्यान नवीन घर, गाडी , दुचाकी अश्या वस्तूंची खरेदी करतील आणि देशातील सर्वात म्कोठी बँक म्हणजे SBI यात तुम्हाला पुरेपूर मदत करून तुमच्या आनंदात भर घालणार आहे. या बँक कडून दिवाळीचा खास मुहूर्तावर काही ऑफर्स (Home and Car Loan) तयार करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त बँक ऑफ बरोडा आणि पंजाब नेशनल बँक देखील आपल्या ग्राहकांना दिवाळीची भेट देणार आहेत.

या आहेत दिवाळी ऑफर्स : Home and Car Loan

धनत्रयोदशी आणि दिवाळी या खास शुभ मुहूर्तावर SBI तुम्हाला व्याजदरात भली मोठी सूट देऊ करणार आहे. ग्राहकांच्या क्रेडीट स्कोर नुसार 0.65 टक्क्यांचा लाभ तुम्ही मिळवू शकता आणि हि विशेष ऑफर 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत वैध असेल. त्यानंतर पंजाब नेशनल बँक हि आपल्या ग्राहकांना 8.40 टक्क्यांच्या दराने गृह कर्ज देऊ (Home and Car Loan) करणार आहे, आणि याच दरम्यान बँक कडून कागदपत्रे किंवा प्रक्रियेवरील शुल्क आकारले जाणार नाही. बँक ऑफ बरोडा देखील आता मागे नाही कारण ही बँक आपल्या ग्राहकांसाठी विशेष मोहीम उभी करून सज्ज्य आहे, 31 डिसेंबर 2023 पर्यंत बँकेकडून ग्राहकांना 8.40 टक्क्यांच्या सवलतीने गृह कर्ज मिळवणं शक्य होणार आहे आणि यावर बँक कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारणार नाही. त्यामुळे या सर्व सवलतींचा पुरेपूर फायदा करून घ्या आणि दिवाळीच्या सणाची मजा लुटा.