जुन्या घराच्या नूतनीकरणासाठीही मिळतंय कर्ज; काय लागतात कागदपत्रे? किती रुपयांपर्यंत मिळते रक्कम?

बिझनेसनामा ऑनलाईन । आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा आवश्यक वस्तू घेण्यासाठी आपण बँकेकडून लोन घेत असतो. आणि हे लोन व्याजानुसार फेडत देखील असतो. होम लोन, कार लोन,यासारखे अनेक लोनचे प्रकार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? तुमचे जुने घर तुम्हाला नव्या डिझाईनमध्ये बनवायचं असेल म्हणजेच जुन्या घराचेच नूतनीकरण करायचं असेल तर तरीही बँकेकडून आणि काही कंपन्याकडून तुम्हाला कर्ज दिले जाते.बऱ्याच कंपन्या नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या या प्रकारचे लोन ग्राहकांना देत असतात. या प्रकारचे लोन घराची किंमत कमी करण्यासाठी घेतले जाते. या लोन मधून घरातील वेगवेगळ्या भागांची सुधारणा, नवीन रूम बांधण्यासाठी, स्वयंपाक, घर, स्नानगृह पुन्हा नव्याने उभारण्यासाठी, किंवा प्लंबिंग इलेक्ट्रिकल आणि घरा संबंधित काही काम करण्यासाठी खास मदत होते.

किती रुपयांपर्यंत कर्ज मिळेल?

जर तुम्हाला घर नवीन पद्धतीने बांधण्यासाठी कर्ज हवे असेल तर तुम्ही 5 लाख पासून तर 25 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन घेऊ शकतात. यासाठी बँकेकडून आणि लोन देणाऱ्या कंपन्याकडून लोन ची रक्कम ठरवली जाते. ही रक्कम आपली मालमत्ता, डॉक्युमेंट यावर अवलंबून असते. गृह कर्जाचा व्याजदर हा क्रेडिट स्कोर कर्जाची रक्कम, कर्ज धारकाचे प्रोफाइल, व्यवसाय या गोष्टींवरून मोजला जातो. हा व्याजदर पर्सनल लोन पेक्षा कमी असतो. अंदाजे 8% ते 12% पर्यंत या कर्जावर व्याजदर आकारला जाऊ शकतो. त्याचबरोबर हे लोन फेडण्याचा कालावधी हा 20 वर्षापर्यंत असू शकेल.

काय कागदपत्रे लागतील ?

बऱ्याच देशात घराच्या नूतनीकरणासाठी देण्यात येणाऱ्या लोन वर सूट देण्यात येते. त्यासाठी तुम्हाला देशातील आयकर विभागाचे नियम समजून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे देखील गरजेचे आहे. या कागदपत्रांमध्ये ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पासपोर्ट मागवण्यात येते, त्याचबरोबर आयकर प्रमाणपत्र, निवासी सत्यप्रत, कर रिटर्न, बँके संबंधित कागदपत्र, गुंतवणूक प्रमाणपत्र यांचा समावेश होतो.

जर तुम्हाला हे लोन घ्यायचे असेल तर काही नियम लावण्यात आलेले आहे. या नियमांमध्ये लोन घेणारा व्यक्ती भारतीय असावा. यानंतर त्याचं वय 18 वर्षापासून ते 65 वर्ष यामध्ये असावं. लोन घेणारा व्यक्ती स्वयंरोजगार आणि पगारदार असावा. त्याचबरोबर त्याला 25 हजार रुपये प्रति महिना आणि बँक रिलेटेड असलेला क्रेडिट स्कोर हा 750 च्या वर असणे गरजेचे आहे.