Home Loan : आयुष्यभर आपण मेहनत करतो, कष्ट घेतो कारण आपलं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सोपं व्हावं म्हणून. बदलत्या जगात माणसाच्या गरजा वाढत चालल्या आहेत, आणि या सर्व प्रकारच्या गरजा पुरवण्यासाठी गरज भासते ती पैश्यांची. तसेच बाजारात महागाई दिवसेंदिवस उचांक गाठत आहे. त्यामुळे अश्या कठीण काळात सोबत पैसे असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि अश्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतलं जातं. कर्ज घेण्याची अमुक एक वेळ किंवा वय नसतं, एखाद्याच्या गरजेप्रमाणे कर्ज घेण्याची वेळ ओढवू शकते. अनेक लोकं 30 वर्ष ओलांडण्याआधी गृहकर्ज डोक्यावर ओढवून घेतात. यात काही टक्के लोकं अशीही आहेत जी 20 वर्षाच्या वयातच कर्ज घेण्याचा विचार करतात, कारण हातात नोकरी असल्यामुळे त्यांना स्वावलंबी असल्याप्रमाणे वाटतं. आज जाणून घेऊया असे काही घटक ज्यानुसार माणूस कर्ज काढण्याबाबत निर्णय घेत असतो.
१) आर्थिकदृष्ट्या सुधृढ असणे: Home Loan
एखादा माणूस जर का आर्थिक बाजूने भक्कम असेल तर अश्या माणसाची कर्ज घेण्याची आशंका अधिक असते. कारण त्यांच्या मते हातात पैसे असल्याने ते स्वतः कर्जाची परतफेड करू शकतात त्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची गरज नसते.
२) करियरमध्ये स्थिरता:
अनेक लोकं करियरमध्ये स्थिरता येईपर्यंत कर्ज घेण्याचा विचार करत नाही. इथे देखील दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचा घटक जबाबदार आहे, करियरमध्ये स्थिरता असणं म्हणजे अमुक एका दिवसापर्यंत हातात पैसे नक्कीच येणार याची शाश्वती असते आणि म्हणूनच कर्जाची परतफेड करण्यासाठी इतर कोणाची गरज भासत नाही.
३) वयक्तिक ध्येय: Home Loan
हातात पैसे यायला सुरुवात झाली कि काही माणसं काही अंशी स्वतःवर खर्च करण्याला प्राधान्य देतात. मग ते कुठेही फिरायला जातील किंवा इतर ठिकाणी खर्च करतील. मात्र तोपर्यंत ते कर्ज घेण्याबाबत कोणताही विचार करणार नाहीत.
४) बाजारी परिस्थिती :
बाजारी परिस्थिती नेमकी कशी आहे याचा विचार कर्ज घेण्याआधी केला जातो.
देशातील तज्ञांच्या मते बाजारातील गृह कर्ज (Home Loan) घेणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढ आहे, आणि यांमध्ये अधिकाधिक 30 वर्ष आणि त्यापेक्षा लहान वयातील तरुणांचा समावेश होतो. आर्थिक वर्ष 2024 मध्ये यात 50 टक्के ते 60 टक्के वाढ दिसून आली होती . बाजारी परिस्थितीचा आढावा घेतला तर वयाच्या 29 साव्या वर्षी माणूस पहिल्यांदा कर्ज घेतो. तरुणानांना आर्थिक व्यवहार आणि बाजार यांमध्ये रुची निर्माण होत असल्यामुळे आकड्यांमध्ये बदल दिसून आला आहे.