Home Loan Benefits For Women | होम लोन घेण्याचा विचार करत आहात का? होम लोन तुमच्यासाठी खरंच महत्वाचं असेल तर हि बातमी नक्की वाचा कारण इथे आम्ही होम लोनवर कशी मोठी सवलत मिळवली जाऊ शकते याबद्दल चर्चा करणार आहोत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कि महिलांना होम लोनवर अनेक फायदे उपलब्ध आहेत, म्हणून जर का तुम्ही तुमच्या बायकोच्या नावावर घर खरेदी केलं तर तुम्हाला तब्बल २ लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
महिलांना होम लोनचा हा फायदा मिळतो :
महिलांना इतर बाबतीप्रमाणे गृह कर्जावरही काही सवलती (Home Loan Benefits For Women) उपलब्ध आहेत. बँका किंवा इतर वित्तीय संस्था पुरुषांपेक्षा महिलांना कमी व्याजदरात होम लोन देतात. पुरुषांपेक्षा महिलांना इथे अर्धा ते एक टक्के कमी कर्ज मिळवण्याची मुभा आहे. त्यामुळे पती किंवा आईच्या नावावर लोन घेऊन तुम्ही या सवलतींचा फायदा करून घेऊ शकता. याशिवाय महिलांना गृहकर्जावरील व्याजावर अनुदानाचा लाभ मिळतो. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी विभागात महिलांना 2.67 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.
महिनांना या कायद्यानुसार मिळते अनुदान: Home Loan Benefits For Women
आयकर कायदा (Income Tax) कलम 80C च्या अंतर्गत महिलांना कर्जाच्या रकमेच्या कारवार सुट मिळते. हि सुट 1.50 लाख रुपयांची असून कलम 24B च्या प्रमाणे तयार घरासाठी होम लोनच्या व्याजावर 2 लाख रुपयांची कर सूट मिळू शकते. हा सणासुदीचा काळ असल्यामुळे बँका अनेक योजना घेऊन येतील, ज्यात महिलांसाठी खास ऑफर्स उपलब्ध असतील. यांबद्दल जास्ती माहिती मिळवत नक्कीच तुम्ही सुविधाचा फायदा करवून घ्यावा.