Home Loan : कर्जाची परतफेड केलीत, पण ‘ही’ महत्वाची कागदपत्रे परत मिळवलीत का?

Home Loan : स्वतःचं घर असावं हे आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असेल, आणि ते नक्कीच असावं. कष्ट करून बांधलेलं आणि आपल्या परिवाराला सुरक्षित वातावरण देणारं घर नक्कीच असावं. मात्र महागाई कित्येक जणांना अनेक वर्ष कष्ट करूनही हे स्वप्न साकार करू देत नाही. आणि म्हणून पाऊलं वळतात ती कर्जाकडे. कुणी जाणून बुजून कर्ज काढत मनावर ताण घेऊन इच्छित नसतो, पण ओढवलेली परिस्थितीच माणसाला मनात नसताना देखील कर्जाचा भागीदार बनवते. अनेक बँका आणि वित्तीय सेवा कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काही सवलती देऊ करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का घराचे पूर्ण कर्ज भरल्यानंतर काही कागदपत्रे वेळेतच परत मिळवली पाहिजेत. कर्ज घेताना आणि परतफेड झालयास या घटकाचा विचार मात्र क्वचितच काही लोकं करतात, त्यामुळे आज जाणून घेऊया कर्जाची परतफेड झाल्यानंतर आवर्जून परत मिळवावी अशी कागदपत्रे कोणती?

गृह कर्जाची परतफेड झाल्यानंतर हि कागदपत्रे परत घ्या: (Home Loan)

अनेक सामान्य घरात वावरणाऱ्या माणसांसाठी कर्जाशिवाय स्वतःचं घर घेणं शक्य नाही, मनात कितीही इच्छा असली तरी देखील पैश्यांच्या अभावामुळे हे स्वप्न काही केल्या पूर्ण होत नाही. आणि हे स्वाभाविक आहे कारण कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या हातात एवढी मोठी रक्कम असूच शकत नाही. 20 ते 30 वर्ष लागून या कर्जाची परतफेड केली जाते आणि माणसाचं अर्ध आयुष्य त्यातच निघू जातं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आकडे सांगतात कि मार्च 2023 मध्ये लोकांनी घेतलेल्या गृहकर्जाच्या आकडा 19,36,428 कोटी रुपये एवढा मोठा होता. मात्र कायम लक्ष्यात ठेवा कि कर्जाची परतफेड झाली म्हणजे काम संपत नाही. इथे काही महत्वाची कागदपत्रे अडकून पडलेली असतात ती जर का परत मिळवली नाही तर येणाऱ्या काळात संकटांचा सामना करावा लागू शकतो.

सगळ्यात अगोदर तुम्ही कर्ज घेतलेल्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे कोणती कागदपत्रं खरोखरीच शिल्लक आहेत का हे तपासून बघा. हि कागदपत्रे सुरक्षा म्हणून बँक त्यांच्याजवळ ठेवत असते, यांमध्ये करार, विक्री करार यांसारखी महत्वाची कागदपत्रे असू शकतात (Home Loan). तसेच हि कागदपत्रे परत घेताना एखादे कागदपत्र गहाळ झाले नाही ना हे एकदा नीट तपासून घ्या.

परतफेडीनंतर हि कामं करणं महत्वाचं:

तुमचे कर्ज परत करून झाले असले तरीही तरीही फायलिंग आणि रिजेक्शनसह नमूद केलेली कागदपत्रं अपडेट करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कर्ज देताना बँक पोस्ट डेटेड चेक आपल्याकडून घेतात, जेणेकरून एखादं EMI चुकलं तर बँक त्याचा धनादेश म्हणून वापर करून पैश्यांची वसुली केली जाऊ शकते. त्यामुळे कर्ज भरल्यानंतर हा चेक परत मिळवा. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या नावावर आता कोणतीही थकबाकी उरलेली नाही, तसेच तुम्ही कर्जाची संपूर्ण रक्कम परत केलेली आहे असा त्याचा अर्थ होता. म्हणून बँकेकडून कोणतीही थकीत रक्कम बाकी राहिलेली नाही याचे प्रमाणपत्र मिळवा (Home Loan). कर्जाची परतफेड झाल्यानंतरटी बँकेचा त्यावर कोणताही अधिकार नाही हे सिद्ध करण्यासाठी सर्व अधिकार तुम्ही परत मिळवला पाहिजेत.

प्रत्येक बँकेत कायदेशीर सल्लागारांचे एक पॅनल असते जे सर्व तपशील तपासून अहवाल तयार करतात . या दस्तऐवजात तुमच्या मालमत्तेच्या संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांचा तपशील जोडलेला असतो. त्यामुळे कर्ज परत केल्यानंतर बँक कडून हे अपडेट प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे सगळ्यात शेवटी बँका कर्जाची परतफेड झाली आहे हि माहिती क्रेडिट कार्ड कंपन्यांना देत नाहीत. त्यामुळे वेळेतच तुम्ही क्रेडिट कार्ड अपडेट करून घ्या. या सर्व तपशिलाचा ऑनलाईन तसेच ऑफलाईन तपशील तुमच्याजवळ असणे अनिवार्य आहे हे कायम लक्ष्यात असू द्या.