Home Loan : आता घर खरेदी करणं होणार सोप्प? RBI च्या धोरणाचा सर्वसामान्यांना फायदा?

बिझनेसनामा ऑनलाईन । कुठलंही कर्ज घेतल्यानंतर त्याची व्याजासहित परतफेड करावी लागते. गृह कर्जाच्या (Home Loan) बाबतीत सुद्धा हीच गोष्ट लागू होते. ह्या कर्जाची रक्कम तुम्ही EMI चा वापर करून दरमहिन्याला परत करू शकता. इथे परवडणारा दर आणि EMI नियमित भरणे या दोन गोष्टी फारच महत्वाच्या असतात. यात अजून एक गोष्ट सर्वात मोठी भूमिका बजावते ती म्हणजे रेपो रेट(Repo Rate) आपल्या देशात सलग चार वेळा रेपो रेटमध्ये बदल झालेला नाही, त्यामुळे घर खरेदी करू पाहणार्यांसाठी हि सर्वात आनंदाची बाब म्हणावी लागेल.

दिवाळीत हमखास घर विकत घ्या: Home Loan

रेपो रेट कायम राहिल्यामुळे घर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी दिवाळी आधीच मिळणारं बक्षीस आहे. यामुळे घर विकत घेणे, घरांचे बांधकाम करणे इत्यादी गोष्टींना चालना मिळण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच बांधकाम व्यवसाय सुद्धा आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. हि आर्थिक उलाढाल जर का योग्यरित्या झाली तर देशाच्या आर्थिक परीस्थित सकारात्मक बदल पाहायला मिळतील, आणि अर्थव्यवस्था अजून बळकट होईल.

सणांच्या या काळात लोकं घर विकत घेणे, गाडी विकत घेणे किंवा दागिने विकत घेण्यावर जोर देतात. आणि बाजरी परिस्थिती चांगली राहिली तर तर अश्या निर्णयांना परिस्थितीचं बळ मिळाल्यासारखं होतं. RBI ने रेपो रेट कायम ठेवण्याचा घेतलेला निर्णय हा अनेकांच्या पसंतीत उतरू शकतो व वस्तूंची विक्री जोरदार होऊ शकते.

RBIची Repo Rate बद्दल मोठी घोषणा:

RBI म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी आपले चौथे द्विमासिक पतधोरण (Fourth Quarterly Credit Policy)जाहीर केले. यात एक महत्वाची बातमी समोर आली ती म्हणजे रेपो रेटमध्ये बँक कडून कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. याआधी वर्ष 2023 मध्ये रेपो रेटमध्ये शेवटचा बदल करण्यात आला होता आणि तेव्हापासून तो 6.5 टक्क्यांवर कायम आहे. हि मोठी घोषणा घर विकत घेऊ पाहणाऱ्या लोकांसाठी मोठी फायदेशीर ठरणार आहे, कारण वाढत्या रेपो रेटमुळे व्याजदर बदलतात आणि हप्त्याची रक्कम वाढते. रेपो रेट कायम राहिल्यामुळे गृह कर्जाची रक्कम वाढणार नाही आणि हि आर्थिक स्थिरता ग्राहकांना अधिकाधिक गोष्टींमध्ये गुंतवणूक करायला मदत करेल.

बांधकाम आणि वाहन क्षेत्रांचा यात मोठा फायदा होईल कारण सणांच्या काळात लोकं अश्याच गोष्टींची अधिकाधिक खरेदी करतात. या क्षेत्रांमध्ये प्रगती कायम होत राहिली तर आपोआपच देशाची आर्थिक सुधारेल. यंदाच्या तिमाहीत देशातील प्रमुख सात शहरांमध्ये 1 लक 20 हजार 280 घरांची विक्री झाली आहे. या विक्रीत यंदा 36% वाढ झाली असून, अजून चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.