Honeyfall App : आजच मोबाईल मधून हे App करा डिलीट; केंद्र सरकारकडून जनतेला अलर्ट

Honeyfall App : देशात घडणारे तांत्रिक बदल हे आपल्या फायद्याचे असले तरीही त्याचे तोटेही भरपूर आहेत. अनेक गोष्टी वेळेत पूर्ण होण्यासाठी विविध प्रकारचे App बनवले गेले आहेत. अगदी “आज मी किती जेवलं पाहिजे किंवा आज मी किती अंतर चाललो” याची आठवण ठेवणारे Apps देखील बाजारात उपलब्ध झाले आहेत. अश्या तांत्रिक बदलांमुळे आयुष्य सोपं झालंय . यात काही असेही App आहेत जे घर बसल्या तुम्हाला कर्ज देखील मिळवून देतात, पण तुम्ही हे जाणता का, कि उपलब्ध असलेले सर्वच App काही विश्वासू नाहीत. काही तांत्रिक बदल तुमची फसवणूक देखील करू शकतात आणि परिणामार्थी तुम्हाला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. आज जाणून घेऊया अश्याच एका App बद्दल आणि खरोखरच जर का हे App तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर ताबडतोब ते काढून टाका आणि फसवणूक होण्यापासून सावध राहा…

ऑनलाईन कर्ज घेताय तर जपून:

दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. तांत्रिक बदल झालेले असले तरीही चोरांनी देखील आता चोरी करण्याचा आणि सामान्य माणसांना लुबाण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे, आणि चोरी करण्याचा त्यांचा काही निश्चित एकाच प्रकार नसतो त्यामुळे आपण जमेल तेवढी स्वतःची सुरक्षा केली पाहिजे. आजच्या जगात पैश्यांवर डल्ला मारण्यासाठी विविध कल्पनांचा वापर केला जातोय आणि इंटरनेटवर होणाऱ्या अनेक चोऱ्या आणि फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत.

सरकारने ऑनलाईन कर्ज देणाऱ्या Apps पासून सावध राहण्याची सूचना अगोदरच दिली आहे. तसेच सायबर दोस्त या सोशल मिडिया हेन्डलवरून अलीकडेच x वर संधर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी हनीफॉल लोन (Honeyfall App) app हा कायमचा मोबाईलमधून हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आत्तापर्यंत गुगल प्ले स्टोरवर (Google Play store) उपलब्ध असलेलं हे app जवळपास 10 हजार लोकांनी डाउनलोड केलेलं आहे, जर का तुम्ही देखील यांमधील एक असाल तर त्वरित हे app मोबाईल मधून हटवा असे त्यांचे म्हणणे आहे.

हनीफॉल वाईट का? (Honeyfall App)

Honeyfall App एका खास कोडसह तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे App डाउनलोड केल्याक्षणापासून हॅकर्स तुमच्या खात्याचा ताबा मिळवू शकतात.आणि तुमचा डेटा त्यांना सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर फसवणूक आणि लुबाडण्यासाठी केला जातो. सायबर दोस्त हे एक ऑनलाईन पोर्टल आहे जी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. वेळोवेळी हे पोर्टल तुम्हाला आजूबाजूला घडणाऱ्या ऑनलाईन गुन्ह्यांबाबत अलर्ट करण्याचे काम करत असते. याआधी सरकारकडून देखील झटपट कर्ज देणाऱ्या App पासून सावध राहा असा संदेश देण्यात आला होता, तसेच विंडमिल मनी आणि रेपिड रुपी प्रो अश्या Apps ना कायमचं हद्दपार करण्यात आलं होतं.