Housing Cost: स्वतःच्या मालकीचं आणि हक्काचं घर असावं असं कोणाला वाटत नाही. मात्र आजूबाजूला दिवसेंदिवस वाढणारी महागाई अनेक सामान्य माणसांना या स्वप्नापासून दूर राहण्यास भाग पाडते. आत्ताच्या जगात स्वतःचं घर बांधणं ही वाटते तेवढी सोपी आणि स्वस्त गोष्ट राहिलेली नाही. भारतात अगदी वेगाने लोकसंख्या वाढत आहे. तसेच कित्येक कुटुंबांमध्ये एका विशेष कालांतराने वेगळं होण्याचा निर्णय घेतला जातो आणि म्हणूनच या परिस्थितीत अनेकांना स्वतःचं वेगळं घर उभारण्याची इच्छा निर्माण होते. एखादं घर बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या वस्तू म्हणजे सिमेंट, वाळू, लोखंड इत्यादी. मात्र हे घटक महाग असल्यामुळे घर बांधू पाहणाऱ्या माणसांचे स्वप्न अद्याप पूर्ण होत नाही आहे. परंतु आता नवं घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
घर बांधू पाहणाऱ्यांना आनंदाची बातमी (Housing Cost):
गेल्या अनेक दिवसांपासून बाजारात घर बांधू पाहणाऱ्या लोकांना त्यांचा हा विचार लांबणीवर टाकावा लागत होता आणि त्याचं एकमेव कारण होतं ‘वाढती महागाई’. परंतु आता बाजारात सळ्यांचे दर हे गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत तीन हजार रुपयांनी स्वस्त झाले असल्यामुळे आता सामान्य माणूस घर बांधण्याचा विचार नक्कीच करू शकतो. आपल्यापैकी अनेक जणं एखादा मोठा निर्णय घेण्याआधी संबंधित घटकांचे दर आटोक्यात येण्याची वाट पाहत असतात. तुम्ही जर का घर बांधण्याचा विचार करत असाल तर हीच स्वस्तात घर बांधण्याची (Housing Cost) योग्य वेळ आहे. जगभरात नवीन वर्षाचे वातावरण तयार होत असताना तुम्ही देखील वैयक्तिक कक्षात काही बदल घडवू शकता. या नवीन वर्षानेच आपल्याला सळ्यांची किंमत कमी करून दिली आहे, 2023 या वर्षा अखेरीस देशभरात सळ्यांच्या किंमत दोन ते तीन हजारांनी कमी झाल्या आहेत.
देशभरात अशी आहे सळ्यांची किंमत:
आताच्या घडीला कानपूर मध्ये 45,700 रुपये प्रति टन रुपयांवर सळ्यांची विक्री केली जात आहे तर रायपूर मध्ये हीच किंमत 43 हजार रुपयांवर आली आहे. आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर जालना येथे सध्या 48,200 रुपये प्रति टन एवढ्या रुपयांवर सगळ्यांची विक्री होत आहे. वर्ष 2022 मध्ये लोखंडाच्या या सळ्यांची किंमत थेट गगनाला भिडली होती. 80 हजार रुपयांच्या आसपास एक टन सगळ्यांची विक्री केली जात होती. ज्यावर 18 टक्क्यांचा वेगळा GST दरही लागू होत होता.
मात्र 2024 च्या सुरुवातीलाच किमतीमध्ये 40 टक्क्यांची घट झालेली पाहायला मिळाली आहे, त्यामुळे आता लोखंडी सळ्यांसह सिमेंट आणि विटांचे दर देखील कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घर बांधणं हे खर्चाचं काम असलं तरीही ते लांबणीवर टाकू नये कारण या महत्त्वाच्या घटकांच्या किमती कधीही बदलू शकतात त्यामुळे योग्य पैशांचे नियोजन करूनच घर बांधण्यास सुरुवात करावी.