Housing Price Index : या शहरांमध्ये घर घेणं फायद्याचं, RBI चा अहवाल पहा

बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील सर्वोच्य बँक असलेल्या रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून गृह किंमत निर्देशांक म्हणजेच Housing Price Index जारी करण्यात आला आहे. गृह किंमत निर्देशांकात दहा राज्यांचा समावेश होतो, यांमध्ये मुंबई, दिल्ली, कलकत्ता. चेन्नई,बेंगलोर, अहमदाबाद ,जयपूर , कानपूर आणि कोची या राज्यांची गणना केली जाते. हा रिझर्व बँकचा अहवाल आहे, जो कि संबंधित राज्यांमध्ये झालेल्या नोंदण्यांना आणि मिळालेल्या मालमत्तेला अनुसरून अहवाल सदर केला जातो. नेमका काय म्हणतोय हा अहवाल जाणून घेऊया…

Housing Price Index:

रिझर्व बँकने जाहीर केलेल्या अहवालात टीअर-1 आणि टीअर-2 शहरांमधील मालमत्तेच्या परताव्या विषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये कोची शहरातून सर्वाधिक परतावा मिळाल्याची नोंद आहे. बँकची आकडेवारी सांगते कि सप्टेंबर महिन्यात देशातील बँकांचे कर्ज 40 टक्क्यांनी वाढून 30 लाख कोटी झाले आहे, यात हाउसिंग आणि रियल इस्टेट या दोन्ही क्षेत्रांचा समावेश आहे. या अहवालात आपल्याला सगळ्यात शेवटी जयपूर या शहराचे नाव पाहायला मिळते.

एवढे दिवस बाजारात टीअर-1चा दबदबा पाहायला मिळत होता मात्र आता टीअर-2 ने देखील परिश्रम घेत स्पर्धेत बाजी मारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. टीअर-2 मध्ये गुडगाव, अहमदाबाद, इंदोर,पुणे, जयपूर आणि कोची हि शहरं कमालीची कामगिरी करून दाखवत आहेत. मागच्या पाच वर्षांचा आकडा पहिला तर या शहरांच्या मालमत्तेत 33 टक्क्यांची वाढ झालेली आहे.

देशात रियल इस्टेटची वाढ:

देशात अनेक ठिकाणी शहरीकरणाला जोर मिळाला आहे, यामुळे देशातील अनेक क्षेत्राचं रूपांतरण शहरांमध्ये झालेलं दिसत. मागच्या दहा वर्षात शहरीकरणाचा वेग वाढून तो आता 36% झाला आहे. रियाल इस्टेट संघटनेकडून अलीकडेच देशातील उत्कृष्ट 10 शहरांची यादी (Housing Price Index)जरी करण्यात आली ज्यात भुवनेश्वर, कोइम्बत्तुर,जयपूर, कोची, लखनौ, नागपूर, सुरात, विशाखापट्टनम,तिरुअनन्त्पुरम आणि इंदोर यांचा समावेश करण्यात आला होता.