Hyundai IPO: LIC ला मागे टाकत Hyundai मारणार बाजी; आणणार 3 अब्ज डॉलर्सचा IPO

Hyundai IPO: आत्तापर्यंत, देशातील सर्वात मोठा IPO (Initial Public Offering) आणण्याचा विक्रम LIC (Life Insurance Corporation of India)च्या नावावर आहे. पण, लवकरच हा विक्रम मोडला जाऊ शकतो. दक्षिण कोरियातील प्रसिद्ध ऑटोमोबाइल कंपनी ह्युंदाईने भारतात मोठा IPO आणण्याची योजना आखली आहे. कंपनीची योजना या वर्षी दिवाळी 2024 पर्यंत IPO लॉन्च करण्याची आहे आणि माध्यांना मिळालेल्या माहितीनुसार ह्युंदाईचा IPO LIC च्या IPO पेक्षाही मोठा असेल अशी शक्यता आहे.

IPO म्हणजे काय?

ह्युंदाई भारतातील सर्वात मोठ्या कार कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचा IPO भारतातील IPO बाजारासाठी एक मोठा टप्पा असेल. या IPO मुळे भारतातील IPO बाजाराला आणखी चालना मिळेल आणि विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची प्रेरणा दिली जाईल. IPO म्हणजे Initial Public Offering, जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स लोकांना विकण्यासाठी बाजारात आणते तेव्हा त्याला IPO म्हणतात. IPO द्वारे कंपनी सामान्य लोकांकडून पैसे उभारते आणि त्या पैशांचा वापर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी करते.

Hyundai बनवेल का सर्वात मोठा IPO? (Hyundai IPO)

सध्या, LICचा 21,000 कोटी रुपयांचा IPO भारतातील सर्वात मोठा IPO आहे. पण, अहवालांनुसार, ह्युंदाई इंडियाचा IPO हा विक्रम मोडू शकतो. बँकर्सचा अंदाज आहे की ह्युंदाई इंडिया कंपनीचे मूल्य 22 ते 28 अब्ज डॉलर्स इतके मोठे असेल. दक्षिण कोरियामध्ये ह्युंदाई मोटर्स 39 अब्ज डॉलर्स मार्केट कॅपिटलायझेशनसह सूचीबद्ध आहे.

अंदाजानुसार, ह्युंदाई IPO 3 अब्ज डॉलर्स किंवा सुमारे 27,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो. या आकडेवारीनुसार, ह्युंदाई इंडियाचा प्रस्तावित IPO हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO बनेल. Hyundai India या IPO अंतर्गत विकण्याची योजना आखत असलेला हिस्सा सुमारे 15 टक्के असू शकतो आणि त्याचा आकार सुमारे 27,000 कोटी रुपये असू शकतात.