हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल नोकरीचे वांदे झाले असून त्यामुळे अनेकजण व्यवसाय करण्याकडे वळत आहेत. परंतु नेमका कोणता व्यवसाय करायचा याबाबत मात्र अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. पण तुम्हीही जर व्यवसायाच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस या दिवसात छप्परफाड के कमाई होईल असा व्यवसाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, या व्यवसायाचे नाव आहे आइस क्यूब फॅक्टरी…. उन्हाळयात बर्फाच्या मागणीत प्रचंड वाढ असल्याने तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून घसघशीत कमाई करू शकता. फक्त शहरी भागातच नव्हे तर अगदी खेड्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा बिझिनेस करू शकता. कारण आजकाल खेड्यापाड्यातही बर्फाच्या तुकड्यांची मागणी वाढली आहे.
आइस क्यूब फॅक्टरी व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हांला सुरुवातीला १ लाख रुपये गुंतवावे लागतील. कारण तुम्हांला बर्फ गोठवण्यासाठी मोठा फ्रीजर घ्यावा लागेल ज्याची किंमत ५० हजारांच्या आसपास असेल . फ्रिजर सोबत तुम्हाला अन्य काही इन्स्ट्रुमेंट सुद्धा खरेदी करावी लागतील. जशी जशी तुमची कमाई वाढेल तस तसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल. या व्यवसायात उतरण्यापूर्वी त्याचा संपूर्ण अभ्यास करा आणि आसपासच्या मार्केट मध्ये किती कस्टमर मिळतील याचा आढावाही घ्या.
किती कमाई होईल-
सुरुवातीला तुम्ही जेव्हा या व्यवसायात उतराल तेव्हा तुम्ही दर महिना अंदाजे 30,000 रुपये सहज कमवू शकता. तसेच उन्हाळ्यात सर्वत्र लग्न समारंभ असल्याने व्यवसाय वाढीला मोठी गती मिळते. बर्फ विकण्यासाठी तुम्हांला स्वतः कुठे लांब बाहेर जाण्याची गरज नाही. तुमच्या आसपासची आईस्क्रीमची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फळांची दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांना तुम्ही बर्फ विकू शकता.