IDBI Bank Shares : 2024 हे वर्ष आपल्या देशासाठी विशेष असणार आहे, कारण या वर्षात देशात लोकसभेच्या निवडणुका होतील. मात्र या निवडणुका होण्याआधी IDBI बँकसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. हि बँक विकण्याचा विचार सरकारच्या मनात सुरु आहे. असं म्हटलं जातंय, या बँकेचा काही हिस्सा विकण्याची प्रक्रिया सरकारने सुरु केली आहे अशीही बातमी समोर आली. सरकारवर IDBI बँकचा हिस्सा विकण्याची वेळ का आली, व ती ऐन निवडणुका तोंडावर असताना कुणाला विकली जात आहे हे जाणून घेऊया..
सरकार विकणार IDBI Bank Shares?
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतना सरकार कडून IDBI बँक विकण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बँकचा हिस्सा विकत घेण्याची इच्छा असल्यास समोर येण्याची मागणी सरकारने केली आहे, तरीही सरकारकडून IDBI बँकची विक्री (IDBI Bank Shares) पुढील आर्थिक वर्षात ढकलली जाऊ शकते.डिसेंबर महिन्यापर्यंत बँकची बोली सुरु करून मार्च 2024 पर्यंत बँकचा हिस्सा विकण्याचा विचार सरकार कडून केला जात आहे.
बँकसाठी बोली लावलेल्या काही नावांमध्ये कोटक महिंद्रा बँक, फेअरफॉक्स, अव्हेन्यू केपिटल्स यांचा समावेश आहे. सरकार कडून बँकचा हिस्सा विकण्याच्या या प्रस्तावाला अजून केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व बँक कडून परवानगी मिळालेली नाही, या बँकचे शेअर्स विकणार तर रिझर्व बँकची परवानगी मिळणं अनिवार्य आहे .मात्र बँक सोबत या विषयी चर्चा सुरु असून लवकरच तिथून मंजुरी येईल अशी बातमी फिरत आहे.
सरकार बँकचे कोणते शेअर्स विकणार?
बँकचे शेअर्स विकण्याचा विचार सरकारच्या मनात मागच्या वर्षीपासून सुरु आहे. IDBI बँक मधील 30.48% असा सरकारी हिस्सा आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा 30.24% हिस्सा विकण्याचा हा सगळा खटाटोप आहे. हा हिस्सा विकला तर सुमारे 15 हजार कोटी रुपयांपर्यंत पैसे जमा केले जाऊ शकतात असा विश्वास भारत सरकारला आहे,. IDBI बँक नंतर शिपिंग कोर्पोरेशन ऑफ इंडिया, NMDC स्टील, HLL लाईफकेअर इयादी कंपन्यांचे खासगीकरण होण्याची शक्यता आहे.