IIFL Finance: IIFL Finance च्या गोल्ड लोनवर RBI कडून बंदी; नेमकं प्रकरण काय झालं?

IIFL Finance: भारतीय रिजर्व बँकेने (RBI) नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) IIFL फायनान्सवर मोठी कारवाई करत गोल्ड लोनवर बंदी घातली आहे. यामुळे IIFL फायनान्स आता नवीन गोल्ड लोन देऊ शकणार नाही. मात्र, पूर्वी दिलेली गोल्ड लोन सुरूच राहतील. केंद्रीय बँकेने देखरेखीतील चिंतांमुळे हे पाऊल उचलले आहे.

सर्वोच्य बँकने उचलली तलवार: (IIFL Finance)

IIFL फायनान्सवर गोल्ड लोन जारी करण्यावर RBI ने बंदी घातली आहे. RBI ला काही देखरेखीबाबत काही चिंता असल्याने कंपनीने Loan To Value Ratio (LTV) च्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले आहे. RBI ने म्हटले की IIFL फायनान्सने LTV रेशोचे उल्लंघन केले आहे आणि त्यामुळे कंपनीवर गोल्ड लोन जारी करण्यावर बंदी घातली आहे. RBI कंपनीच्या कारभारासाठी स्पेशल ऑडिट करणार आहे आणि ऑडिट पूर्ण झाल्यावर RBI प्रतिबंधांवर पुनर्विचार करेल.

LTV Ratio काय आहे?

LTV Ratio तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम तुमच्या गहाण ठेवलेल्या सोन्याच्या मूल्याच्या तुलनेत दर्शवते. RBI ने LTV Ratio 75 टक्क्यांपर्यंत मर्यादित केली आहे, याचा अर्थ तुम्ही तुमच्या सोन्याच्या मूल्याच्या 75 टक्क्यांपर्यंतच कर्ज घेऊ शकता.

आज म्हणजेच 4 मार्च रोजी IIFL फायनान्सचा स्टॉक 3.35 टक्क्यांवरून घसरून 598.10 रुपयांवर बंद झाला (IIFL Finance). बाकी कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 704.20 आणि नीचांकी 408.40 आहे. NBFC चे बाजार मूल्य 22,816.50 कोटी रुपये असून एका वर्षात स्टॉकने 34 टक्क्यांचा परतावा दिला आहे.