IIM-A Summer Placement : अनेकांनी मिळवल्या नोकऱ्या; Goldman Sachs ठरले सर्वोत्तम रिक्रूटर

IIM-A Summer Placement: IIM म्हणजेच इंडिअन इंनस्टीट्युट ऑफ मेनेजममेंटकडून समरप्लेसमेंट सुरुवात झाली आहे. बुधवारपासून महाविद्यालयाने या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. हि प्लेसमेंट मुलांसाठी फारच फायद्याची ठरत आहे असं एक चित्र समोर आलंय कारण आजच्या पहिल्या दिवसांतच जवळपास 60 मुलांना दरम्यान नोकऱ्या मिळाल्या आहेत. IIM हे देशातील सर्वात प्रसिद्ध आणि परिचित महाविद्यालय आहे, ज्यांच्या शाखा अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या प्लेसमेंटमुळेच अधिकाधिक मुलं इथे प्रवेश मिळवतात. सध्याची हि प्लेसमेंटची फेरी समरप्लेसमेंट क्रियेच्या पहिल्या क्लस्टरचा एक भाग होती. याव्यतिरिक्त महाविद्यालाकडून अजून दोन क्लास्टर्स रामावले जाणार आहेत.

IIM च्या समरप्लेसमेंटची जोरदार सुरुवात: IIM-A Summer Placement

आज IIM च्या समरप्लेसमेंटचा पहिला टप्पा (IIM-A Summer Placement) पार पडला. यात गुंतवणूक बँकिंग आणि बाजार, व्यवस्थापन, इक्विटी, उद्यम भांडवल आणि मालमत्ता व्यवस्थापन यांसारख्या कंपन्यांचा सहभाग होता.आतापर्यंत समरप्लेसमेंटमध्ये 60 ऑफर्स मुलांसमोर ठेवण्यात आल्या होत्या, ज्यांपैकी 22 ऑफर्स या केवळ Boston Consulting Group कडून देण्यात आल्या होत्या. तसेच Goldman Sachs यांना आपण समरप्लेसमेंटचे सर्वात मोठे रिक्रूटर म्हणू शकतो. यांच्या व्यतिरिक्त Bain & Company, McKinsey & Company आणि Accenture Strategy या कंपन्यांनी IIMच्या मुलांना कामाच्या संधी उपलब्ध करवून दिल्या आहेत.

‘बिग फोर’ अकाउंटिंग कंपन्यांपैकी तीन कंपन्यांनी पहिल्या दिवशी समर इंटर्नची नियुक्ती केली. Bank of America, Citibank, Morgan Stanley, Goldman Sachs, JP Morgan Chase आणि HSBC यांनीही मनपसंत कर्मचारी निवडून घेतले.