बिझनेसनामा ऑनलाईन । LED संबंधित सेवा पुरवणार्या IKIO Lighting च्या शेअर्सनी आज बाजारात धमाकेदार सुरुवात केलीआहे. IKIO Lighting च्या IPO ला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा शेअर IPO गुंतवणूकदारांना 285 रुपयेच्या प्राईस बँड किमतीत निश्चित करण्यात आला होता. परंतु आज IKIO Lighting IPO चे शेअर्स 391 रुपयांवर सूचीबद्ध झाले. म्हणजेच गुंतवणूकदारांना 37 टक्के लिस्टिंग गेन मिळाला आणि प्रति शेअर 106 रुपयांची बंपर कमाई झाली.
गुंतवणूकदारांना प्रतिशेअर 106 रुपयांचा घसघशीत फायदा –
IKIO Lighting चा स्टॉक शुक्रवारी सकाळी 10 वाजता BSE आणि NSE वर लिस्ट झाला. कंपनीचा लॉट साइज 52 शेअर्सचा होता. आज हा शेअर BSE वर 37.19 टक्के प्रीमियमसह 391 रुपयांवर लिस्टेड झाला. IKIO Lighting IPO ची प्राईज बँड 270-285 रुपये किमतीत निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरमागे तब्बल 106 रुपयांचा घसघशीत फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या बीएसईवर आईकियो लाइटिंगचा शेअर्स 415 रुपयांवर व्यवहार करत आहे. IKIO Lighting चा IPO गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक लाभ करून देईल असा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला जात होता.
कंपनीचा इश्यू साइज 606.5 कोटी होता –
दरम्यान, IKIO Lighting च्या IPO चा इश्यू साइज 606.5 कोटी रुपये होता आणि त्याअंतर्गत 1.52 कोटी शेअर्स ऑफर करण्यात आले होते. IKIO Lighting IPO च्या 606.5 कोटी रुपयांच्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (QIBs) 67.75 पट इश्यूची सदस्यता घेतली. गैर-संस्थात्मक भाग 65.38 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा भाग 14.31 पट भरला. Ikeo Lighting ही नोएडा स्थित कंपनी आहे. ही कंपनी एलईडी लाइटिंग सोल्यूशन्स तयार करते. Ikeo Lighting ची स्थापना 2016 मध्ये झाली.