IMF Help To Pakistan । पाकिस्तान हा आपला शेजारी देश असला तरीही तिथे चाललेल्या घडमोडीकडे आपण जरा जास्तीच लक्ष देऊन असतो. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध काही फारसे बरे नाहीत आणि हि बातमी जगजाहीर आहे. आपण तर त्यांच्या अगदी छोट्यातल्या छोट्या हालचालींकडे वळून बघत असतो, त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थती (Pakistan Economy) हा तर आपल्यासाठी अगदीच महत्वाचा विषय आहे. आपल्या शेजारी देशाची आर्थिक परिस्थिती हि तशी नेहमीच बिकट होती, आणि अजून काही यात सुधारणा होताना दिसत नाही. आजही पाकिस्तान आर्थिक अडचणींना तोंड देत आहे, नेमकी कशी आहे पाकिस्तानची आर्थिक परिस्थती आज जाणून घेऊया..
अशी आहे पाकिस्तानची आर्थिक स्थिती :
आपल्या शेजारी देशाची आर्थिक स्थती हि नेहमीच जरा बिकट होती आणि अजूनही त्यात काही विशेष बदल होताना दिसत नाहीत. पाकिस्तानचे अर्थमंत्री शमशद अख्तर हे त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना म्हणतात कि आजच्या घडीलाही पाकिस्तानची आर्थिक स्थती नाजूक आहे आणि येणाऱ्या काळात देशाला IMF कडून अधिक कर्ज घेण्याची गरज देखील पडू शकते. त्यांच्या मते देशातील आर्थिक स्थती सुधारत असली तरीही तिची नाजूक अवस्था अजून कायम आहे, आणि वेळीच यावर मेहनत घेऊन ती अजून बळकट करावी लागणार आहे. जोपर्यंत पाकिस्तान निर्यात आणि देशांतर्गत संसाधने वाढवू शकत नाही तोपर्यंत त्यांना मेहनत करावी लागणार आहे.
3 अरब अमेरिकी डॉलर्सचा करार (IMF Help To Pakistan)
पाकिस्तानची आर्थिक परिस्थती सुधारायला अजून बराच अवकाश जाऊ शकतो आणि यासाठी त्या देशाला अजून एका IMF म्हणजेच विस्तारित फंड सुविधेची गरज पडू शकते. आणि म्हणूनच पाकिस्तान सरकार IMF सोबत कायम राहील असे वक्तव्य पाकिस्तानचे अर्थमंत्री शमशद अख्तर यांनी केले. पाकिस्तान सरकार आणि IMF यांच्यात 3 अरब अमेरिकी डॉलर्सचा करार (IMF Help To Pakistan) झाल्यानंतर त्यांनी ही टिप्पणी केली होती, या करारामुळे पाकिस्तानला दुसऱ्या हप्त्यात 700 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.