IMF Help To Pakistan : IMF चा पाकिस्तानला मदतीचा हात; कर्जाबाबत घेतला मोठा निर्णय

IMF Help To Pakistan। आपण भारतीय जर का सर्वात जास्ती कश्यात रुची घेत असू तर ती पाकिस्तानकडून येणाऱ्या बातम्यांमध्ये. पाकिस्तानमध्ये चालेल्या घडामोडी आपल्यासाठी फारच महत्वाच्या असतात. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थती काही फारशी बरी नाही आणि आपला शेजारी देश यात सुधारणा आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानने आपली आर्थिक स्थती सुधारण्यासाठी रक्कम उधार घेतली आहे आणि या उधारीची परतफेड आपल्या शेजारी देशासाठी डोकेदुखी बनू शकते. आज पाकिस्तान मधून आलेली अजून एक महत्वाची बातमी आम्ही मांडणार आहोत त्यामुळे नक्की वाचा थोडक्यात पण महत्वाचं…

पाकिस्तानला दिसलाय आशेचा किरण: IMF Help To Pakistan

जसं कि आपल्याला माहिती आहे पाकिस्तानची आर्थिक परिस्थती काही चांगली नाही. आपल्या शेजारी देशातली महागाई दिवसेंदिवस वाढतेय. देशाची आर्थिक परिस्थती सुधारण्यासाठी पाकिस्तानने IMF कडून मोठी रक्कम उधारीवर घेतली आहे. पाकिस्तानची एकंदरीत स्थती पाहता त्यांना एवढ्या रकमेची परतफेड करता येईल याची शाश्वती वाटत नाही. पण पाकिस्तानला घाबरून जाण्याची गरज नाही कारण IMF कडून त्यांना थोडीशी सवलत (IMF Help To Pakistan) देण्यात आली आहे.

IMF ने पाकिस्तानची चालू आर्थिक वर्षासाठी बाह्य कर्जाची आवश्यकता 25 अब्ज डॉलर्सनी कमी केल्यामुळे पैश्यांच्या तुटवड्याने त्रस्त असलेल्या पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे. बहुपक्षीय एजन्सीकडून 3.4 अब्ज डॉलर्सची कपात झाल्यामुळे (IMF Help To Pakistan) पाकिस्तानने सुटकेचा निश्वास सोडलाय असं म्हणायला हरकत नाही, पाकिस्तान सरकारने चार महिन्यांत सहा अब्ज अएरीकन डॉलर्सचे कर्ज आईएमएफकडून घेतले होते. आता मिळालेला हा दिलासा पाकिस्तानच्या दृष्टीने फारच महत्वाचा ठरणार आहे आणि त्यांच्यावर असलेला दबाव यामुळे काही अंशी नक्कीच कमी झालाय.