Import Duty On Gold : सोनं हा अनेक मौल्यवान धातूंपैकी एक धातू मानला जातो, आपल्या देशात तर सोनं आणि सोन्याच्या दागिन्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुमच्या आजूबाजूला देखील तुम्ही अनेक महिलांना विविध प्रकारच्या सोन्याच्या आभूषणांनी साज-शृंगार करताना पाहिलंच असेल. मात्र आता केंद्र सरकारकडून याच सोन्याच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलाय, ज्याचा थेट परिणाम आपल्यावर होण्याची शक्यता आहे. देशात लवकरच अर्थसंकल्प प्रस्तुत केला जाणार असून त्या आधीच केंद्र सरकारने सोनं आणि चांदीच्या आयात शुक्लत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सरकारच्या या निर्णयामुळे कदाचित आता सोनं आणि चांदीच्या किमती वाढू शकतात. अर्थसंकल्प सादर होण्याआधीच सोनं चांदीच्या बाबत एवढा मोठा निर्णय का घेण्यात आला, आणि आता नवीन आकडा आहे तर काय हे आज जाणून घेऊया….
सोन्या- चांदीच्या किमती वाढणार का? (Import Duty On Gold)
समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने सोनं आणि चांदी तसेच मौल्यवान धातूच्या आयातीवर आकारण्यात येणाऱ्या आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार आता मौल्यवान धातूच्या नाण्यांवरील आयात शुल्क वाढवून 15 टक्के करण्यात आले आहे, ज्यामध्ये 10 टक्के मूळ सीमाशुल्क तर 5 टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर (AIDC) यांचा समावेश होतो. त्यामुळे आता सरकारने सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 12.50 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणले आहे, काल म्हणजेच 22 जानेवारीपासून हा नवीन दूर देशांतर्गत लागू करण्यात आला.
आता कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आयात शुल्क वाढवण्याचा आपल्यावर नेमका काय परिणाम होईल. लक्षात घ्या की देशातील सोन्या-चांदीचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात, म्हणूनच आयात शुल्काचा आपल्यावर मोठा परिणाम होत असतो. आता सरकारच्या नवीन निर्णयानुसार सोन्या-चांदीची आयात वाढल्याने सोन्या चांदीच्या किमतीवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे (Import Duty On Gold). आपला भारत आजही चांदी, सोनं आणि हिरे यांच्या कच्च्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून आहे व म्हणूनच आपल्याला येणाऱ्या काळात महाग विक्रीचा सामना करावा लागू शकतो.