Import Of Goods: आयात आणि निर्यातीच्या नियमांमध्ये केलेले बदल यांचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर होत असतो. आता भारत सरकारने लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीत बदल केल्यामुळे चीनवर भारी परिणाम होणार आहे. भारताकडून लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर ऑनलाइन क्लिअरन्स प्रणाली तयार करण्यात आली आहे. आता देशात येणाऱ्या वस्तू किती योग्य आहेत, त्या विश्वसनीय आहेत कि यांची पाहणी करण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. आता भारतात वस्तूंची आयात करायची असेल तर संबंधित परवाना महत्वाचा आहे.
आयतींच्या नियमांमध्ये बदल का?(Import Of Goods)
सरकारकडून घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. देशातील उत्पादनाला बढावा देण्यासाठी आणि चीनसारख्या देशांमधून होणारी वस्तूंची आयात कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आयात निर्बंधांच्या बाबतीत लोकांच्या चिंता लक्षात घेऊन धोरणात काही बदल करण्यात आले आहेत आणि या बदलांनुसार 1 नोव्हेंबर पासून वस्तूंची आयात करण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय सरकारने जारी केला आहे.
परवाना कसा मिळवाल?
हा परवाना मिळवण्यासाठी तुम्ही सिस्टमवर जाऊन अर्ज करू शकता. परवाना मिळवण्यासाठी वस्तूंचे प्रमाण किंवा किमतींच्या आधारे कोणत्याही देशांवर बंधने नाहीत. यात महसूल विभागाचा समावेश आहे आणि संपूर्ण प्रक्रिय पूर्ण करण्यासाठी केवळ 10 मिनिटांचा अवधी पुरेसा असतो. हा परवाना डिजिटल पद्धतीने जरी केला जाईल अशी माहिती DGFTने दिली आहे.
परवान्यात यांचा समावेश होणार नाही:
डिनाइड आयडेंटिटी लिस्ट नुसार ज्यांची नावं यात सामावलेली असतील त्यांना आयातीचा परवाना मिळणार नाही. या यादीत त्याच कंपन्यांची नावं रुजू केली जातील ज्यांनी एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स सारख्या योजनांचा लाभ घेऊन आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत किंवा त्यांच्याकडून संधार्बत एखादी चूक घडली आहे, शिवाय ज्यांच्या विरोधात डीआरआयचं प्रकरण सुरू आहे अश्यानाही आयातीचा परवाना मिळणार नाही(Import Of Goods).