Inactive Credit Card आहे? भोगावे लागतील ‘हे’ मोठे परिणाम

Inactive Credit Card: तुम्ही क्रेडीट कार्डचा वापर करता का? हो तर आता आम्ही देणारी बातमी हि तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे. क्रेडीट कार्डच्या बाबतीत काही नियम असतात ज्यांचे काटेकोरपणे पालन करण महत्वाचं आहे. पण कधी विचार केलाय का कि एखाद्यावेळी तुम्ही या कार्डचा वापर बंद केलात तर काय होईल? आता कदाचित तुमच्या जवळ असे एखादे क्रेडीट कार्ड आत्ताही असेल. पण घाबरून जाऊ नका. ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा..

अनेक क्रेडीट कार्ड्सचा वापर: Inactive Credit Card

आपल्यापैकी अनेक जणांजवळ एका पेक्षा अधिक क्रेडीट कार्ड नक्कीच असेल, यामुळे काय होतं कि एखाद्या कार्डचा वापर केला जातो आणि बाकी मात्र तशीच पर्समध्ये पडून राहतात. आज तुम्हाला हि गोष्ट कदाचित महत्वाची वाटत नसेल पण याचा गैरपरिणाम तुमच्या क्रेडीट स्कोरवर होत असतो. तसेच या कार्डचा दीर्घकाळात वापर न केल्यामुळे तुमचे आर्थिक जगातील नाव खराब होऊ शकते. आज जाणून घेऊया क्रेडीट कार्डचा वापर होत नसेल तर काय नुकसान होऊ शकते

१) क्रेडीट स्कोरवर परिणाम:

जर का तुमच्या कार्डचा वापर अनेक दिवसांपासून होत नसेल तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या क्रेडीट स्कोरवर होतो. त्यामुळे बँकेला वेळोवेळी तुमच्याकडून आर्थिक व्यवहार केले जात आहेत याची नोंद करून देणं अनिवार्य आणि गरजेचं आहे. आणि जर का बँकसोबत झालेल्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित कार्डचा वापर तुम्ही बंद केलात तर संबंधित हिस्ट्रीवर त्याचा परिणाम दिसून येईल.

२) क्रेडीटचे लिमिट कमी होणे:

तुमच्याकडून जर का कार्डचा वापर होत नसेल तर तर कार्डची लिमिट अपोआप कमी होते ज्याला आपण Credit Limit Utilization असे म्हणतो. याचा विशेषअसा परिणाम होणार नसला तरीही भविष्यात कर्ज घेताना सावकाराला तुम्ही क्रेडीट कार्ड वापरण्यासाठी असक्षम आहात असा गैसमज होऊ शकतो.

३) कर भरावा लागेल:

जर का तुमच्याकडून क्रेडीट कार्डचा वापर केला जात नसेल तर संबंधित अधिकारी तुमच्या नावे कर बसवू शकतात. हि रक्कम वार्षिक किंवा काही महिन्यांमध्ये भरावी लागू शकते. या कराचा प्रमुख उद्देश तुम्हाला क्रेडीट कार्डचा वापर करायला लावणे असाच असतो. अश्या करापासून दूर राहायचे असेल तर कंपनीचे नियम आणि अटी समजून घ्या.

४) क्रेडीट कार्ड रद्द होईल:

तुम्ही जर का क्रेडीट कार्डचा वापर केलाच नाही तर संबंधित अधिकाऱ्यांकडून तुमचे कार्ड कायमस्वरूपी बंद केले जाण्याची शक्यता असते. यानंतर तुम्ही कमावलेले सगळे क्रेडीट पोइंट वाया जातील तसेच तुमच्या क्रेडीट स्कोरला धक्का बसेल.