Income Tax : TDS रिटर्न भरणाऱ्या लोकांसाठी आज इन्कम टॅक्स खात्याकडून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. इन्कम टेक्स विभागाकडून या कर भरणाऱ्या लोकांसाठी एक नवीन नियम बनवण्यात आला आहे. CBDT (The Central Board Of Direct Taxes) ने जारी केलेल्या नवीन नियमांचे पालन करण्याची सुरुवात 1 ऑक्टोबर 2023 पासून झाली आहे. आता जर का तुम्हाला TDS(Tax Deducted at Source) रिटर्न भरताना काही समस्या आल्याच तर या नवीन नियमाची मदत घेऊन ती सोडवली जाऊ शकते. जाणून घ्या याबाबत संपूर्ण माहिती
काय आहे नवीन Income Tax नियम?
CBDT कडून ऑगस्ट 2023 मध्ये इलेक्ट्रोनिक फॉर्म 71 जाहीर करण्यात आला होता.या मध्ये जर का तुमचा TDS चुकीच्या वर्षात कापला गेला असेल म्हणजेच काय तर एका वर्षीचे उत्पन्न दाखवून दुसऱ्याच वर्षीचा TDS कापला गेला असेल तर आता त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. या फॉर्ममुळे चुकीच्या वर्षात कापला गेलेला TDS सहज दृष्ट्या बदलून सुधारता येणार आहे. आयकर कायदा (Income Tax Rule) 1962मध्ये आता सुधारणा करण्यात आली आल्यामुळे हा बदल शक्य झाला आहे. तरीही हि सुधारणा फक्त दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे हे याठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे.
हा फॉर्म कसा भरावा?
संबंधित फॉर्म 71 तुम्हाला ऑनलाईन मिळेल, पण यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी डिजिटल सही करणे अनिवार्य आहे. तसेच इलेक्ट्रिक वेरीफिकेशन कोडही महत्वाचा आहे. फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी इन्कम टेक्स विभागाच्या (Income Tax) अधिकृत साईटवर जाऊन फॉर्म 17 डाउनलोड करा. या फॉर्ममध्ये तुमचे नाव, पत्ता, PAN Card नंबर, तुमचा TDS कोणत्या वर्षी कापला गेला आहे, किती TDS कापला गेला आहे, तुम्ही TDSचा दावा का करत आहात याची माहिती द्यावी लागणार आहे. शेवटी सगळा फॉर्म पुन्हा एकदा तपासून पहा आणि सही करून सबमिट करा. सर्व गोष्टी पडताळून झाल्यानंतर जर का तुमचा दावा योग्य असेल तर तुमचे पैसे परत मिळतील.