Income Tax : आपल्याला मिळणाऱ्या पगारातील काही टक्के भाग हा सरकारजमा केला जातो, ज्याला इन्कम टॅक्स असं म्हणतात. अनेकदा आपण हाच इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करतो. मात्र कायम लक्ष्यात असुद्या किIncome Tax पासून दुर पळताना जर का पकडला गेलात तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. पैसे वाचवण्यासाठी आणि करापासून सावध राहण्यासाठी सर्व प्रकारच्या साधनांचा वापर केला जातो मात्र यात अडकण्याची देखील भीती असते. पण तुम्हाला माहिती आहे का तुमचे कुटुंबच तुम्हाला इन्कम टॅक्सपासून वाचवू शकते? हो! चकित झालात ना? मात्र हि गोष्ट अगदी खरी आहे. तुमचे आई वडील, पत्नी, लहान मुलं इन्कम टॅक्स पासून वाचण्यासाठी तुमची मदत करू शकतात. ते कसं? हे जाणून घ्यायचं असेल तर हि बातमी सविस्तर वाचा.
पालक वाचवतील इन्कम टॅक्स: (Income Tax)
आजही तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल तर तुमचे आई वडील इन्कम टॅक्सपासून वाचण्यात तुमची मदत करू शकतात. कारण तुम्ही पालकांनाच HRAचा दावा करून भाडे देऊ शकता. कायद्याने हि गोष्ट चुकीची ठरत नाही कारण आयकर कायद्याच्या कलम 80GG च्या अंतर्गत तुम्ही पालकांचे भाडेकरू बनत HRAचा दावा करू शकता. मात्र इतर कोणत्याही गृहनिर्माणाचा लाभ घेत असल्यास HRA चा दावा करता येत नाही. तुमचे पालक जेष्ठ नागरिकांच्या श्रेणीत येत असतील तर त्यांच्या नावे पैसे गुंतवणून तुम्ही अधिकाधिक व्याज मिळवू शकता तसेच जेष्ठ नागरिकांना एका वर्षात 50 हजार रुपयांपर्यंत असलेल्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही आणि सगळ्यात शेवटी तुम्ही पालकांसाठी आरोग्य विमा घेऊन कर सवलतींचा लाभ मिळवू शकता.
तुमचा जोडीदार कसा वाचवेल इन्कम टॅक्स?
घर खरेदी करताना संयुक्त गृहकर्ज घेऊन घर खरेदी करा, ज्यामध्ये तुम्हा दोघांची नावे नोंद केली जातील. अश्या परिस्थितीत तुम्ही दोघेही गृहकर्जावर कराचा दावा करू शकता, आणि मग तुम्हाला कराच्या सवलतींचा दुप्पट फायदा मिळवता येतो. तुम्ही शेअर बाजारात दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणार असाल तर एक लाख पर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळवता येते. समजा तुमची पत्नी गृहीणी असेल किंवा तिला मिळणारा पगार कमी असेल तर तिला पैसे देत तिच्या नावावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते, यामुळे तुमच्या नावे मिळवलेल्या नफ्यावर कर भरावा लागणार नाही. आणि पत्नीला शिक्षण घेण्याची मदत करत तुम्ही कलाम 80E च्या अंतर्गत शिक्षण कर्जाच्या व्याजावर 8 वर्षांसाठी कर सूट मिळवू शकता (Income Tax) पण हे कर्ज सरकारमान्य बँक किंवा संस्थेमधून घेतलेले असले पाहिजे.
मुलंही देतील कर सवलतीचा फायदा:
केवळ आई वडील किंवा पती पत्नीच नाही तर लहान मुलं सुद्धा तुमचा इन्कम टॅक्स वाचवू शकतात. कलम 80Cच्या अंतर्गत मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयाच्या फीमध्ये 1.5 लाख रुपयांच्या कपातीचा दावा करू शकता.हि सूट जास्तीत जास्त दोन मुलांपर्यंत मिळवता येते. मुलांच्या नावे आपण अनेक प्रकारच्या गुंतवणूका करत असतो ज्यांवर कलाम 80Cच्या अंतर्गत सूट मिळवली जाऊ शकते (Income Tax). शिवाय घेतलेला आरोग्य विमा तुम्हाला 25 हजार रुपयांपर्यंतच्या प्रीमियरवर कर सूट देऊ शकतो.