Income Tax: करदात्यांनो हे वाचा!! 1 लाख रुपयांपर्यंतची थकबाकी सरकारने केली माफ

Income Tax: देशात एक लाख रुपयांपर्यंतची कर थकबाकी असलेल्या एक कोटीहून अधिक करदात्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 13 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एक आदेश जारी केला होता, ज्यानुसार 31 जानेवारी 2024 पर्यंत जुन्या थकबाकी कर दाव्याच्या मागण्या माफ करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ असा की जर तुमची कर थकबाकी 1 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला आता ती रक्कम आता भरण्याची गरज राहिलेली नाही, सरकारने ती माफ करून टाकली आहे.

आयकराबद्दल सरकारची नवीन घोषणा काय? (Income Tax)

CBDT (केंद्रीय थेट कर मंडळ) ने नुकताच एक आदेश जारी केला आहे ज्यामध्ये वर्ष 2020-21 साठी 25,000 रुपयांपर्यंतच्या कर मागणीवर सूट देऊन ती रद्द केले जाईल असे म्हटले आहे. आयकर विभागाकडून हे रद्दीकरण 31 जानेवारी 2024 पर्यंत लागू झालेल्या थकबाकी कर दाव्याच्या मागण्या माफ केल्या आहेत. तसेच, वर्ष 2011-12 ते 2015-16 पर्यंतच्या प्रत्येक वर्षासाठी 10,000 रुपयांपर्यंतच्या कर मागणीवर सूट देऊन ती रद्द केली जाणार आहे. मात्र, ही सर्व रक्कम मिळून 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी (Income Tax). या योजनेबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही CBDT च्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या कर सल्लागाराशी संपर्क साधू शकता.