Income Tax Free State : हे आहे देशातील करमुक्त राज्य; करोडपती सुद्धा भरत नाहीत टॅक्स

Income Tax Free State : आजही देशात काही माणसं अशी आहेत जी या-ना-त्या प्रकारे इन्कम टॅक्स पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. तुमचे हे प्रयत्न जर का सरकारच्या लक्षात आले तर आयकर विभागाकडून तुमच्या विरुद्ध मोठी कारवाई केली जाऊ शकते. मात्र कधी देशातील इन्कम टॅक्स फ्री राज्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा विचार केला आहे का? हो!! आपल्या भारतात असे एक राज्य आहे जिथे इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. या राज्यातील लोकं कितीही पैसे कमावत असले तरी देखील त्यांना सरकारला कर भरावा लागत नाही. या राज्यांत वास्तव्य करीत असलेले मोठ-मोठाल्या श्रीमंत लोकांना सुद्धा सरकारला कर भरावा लागत नाही. कदाचित या बातमीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही बातमी शंभर टक्के खरी आहे. आपल्या देशात असे एक राज्य आहे जिथे स्वातंत्र्यापासून कोणीही सरकारला आयकर भरत नाही. होय आम्ही बोलतोय ते सिक्कीम बद्दल, या राज्याला आयकरातून (Income Tax Free State) सवलत देण्यात आली असून इथे कुणालाही कर भरावा लागत नाही.

स्वातंत्र्यापासून सिक्कीम आयकर मुक्त राज्य: Income Tax Free State

अगदी भारत स्वतंत्र झाल्यापासून इथे नागरिकांना आयकारापासून सवलत देण्यात आली आहे. या राज्याला राज्यघटनेनुसार विशेष दर्जा देण्यात आलाय. भारतीय संघराज्यात विलीनीकरणावेळी या राज्यातील लोकांना आयकारापासून सवलत देण्याचे अभिवचन देण्यात आले होते व म्हणून आजही सिक्कीम मधली कुठलीही लोकं सरकारला कर देत नाहीत. राज्यघटनेच्या कलम 371 अनुसार सिक्किमला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे सिक्कीम मध्ये राहणाऱ्या मूळ नागरिकांना आयकर अधिनियम 1961 च्या कलम 10 (26AAA) अंतर्गत आयकारापासून सवलत मिळते तसेच या राज्यात इतर नागरिकांना संपत्ती किंवा मालमत्तेची खरेदी करता येत नाही.

असं म्हणतात की वर्ष 1642 मध्ये सिक्कीमची स्थापना झाली आणि वर्ष 1975 मध्ये हे राज्य भारतात सामावले गेले. दोघांमध्येही शांततेचा करार झाल्याने वर्ष 1948 मध्ये सिक्कीम मधल्या चोग्याल शासकांनी देशाला आयकर न भरण्याची अट घातली होती, आणि शासनाने देखील सिक्कीमची ही अट मान्य केली होती (Income Tax Free State). केवळ एवढेच नाही तर आत्ताच्या घडीला सेबीने सिक्कीम मधल्या नागरिकांना पॅन कार्डचा वापरा संबंधित काही सवलती देऊन केल्या आहेत. सिक्कीम व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये शेअर बाजार किंवा म्युचल फंड्स मध्ये गुंतवणूक करत असताना पॅन कार्ड हा अनिवार्य दस्ताऐवज समजला जातो, मात्र सिक्कीमचे नागरिक पॅन कार्ड शिवाय देखील गुंतवणूक करू शकतात.